तुरुंगातून बाहेर येताच त्याचा गेम करणार; क्षत्रिय करणी सेनेची लॉरेन्स बिश्नोईला धमकी

तुरुंगातून बाहेर येताच त्याचा गेम करणार; क्षत्रिय करणी सेनेची लॉरेन्स बिश्नोईला धमकी

अभिनेता सलमान खानला धमकी, त्याच्या घरावर गोळीबार प्रकरण, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण या सर्व घटनांमागे बिश्नोई गँगचा हात आहे. त्याच्याकडून अनेकांना खंडणीसाठी धमक्या देण्यात येतात. तसेच ठार मारण्याचीही धमकी देण्यात येते. आता थेट बिश्नोई गँगच्या लॉरेन्स बिश्नोई यालाच धमकी देण्यात आली आहे. क्षत्रिय करणी सेनेने लॉरेन्स बिश्नोईला ठार मारण्याची धमकी दिली आहे. लॉरेन्स बिश्नोई तुरुंगातून बाहेर येताच त्याचा ठार करण्यार असल्याचे करणी सेनेनं म्हटले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून लॉरेन्स बिश्नोईचे नाव चर्चेत आहे, सलमान खान, खासदार पप्पू यादव यांना बिश्नोईच्या नावाने धमक्या आल्या आहेत. मात्र, आता लॉरेन्स बिश्नोईलाच ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. क्षत्रिय करणी सेनेचे प्रमुख राज शेखावत यांनी ही धमकी दिल्ली आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी बिश्नोईवर एक कोटीचे बक्षीस ठेवले होते. त्यानंतर बिश्नोई समजाकाडून याचा निषेध करण्यात आला होता. आता त्यांनी थेट लॉरेन्स बिश्नोईला ठार मारण्याची धमकी दिली आहे.

राज शेखावत यांनी लॉरेन्स बिश्नोईला ठार मारण्याची धमकी दिली आहे. तसेच त्यांनी एका हेल्पलाईनचीही घोषणा केली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून कोणालाही धमकी देण्यात आल्यास किंवा खंडणीची मागणी झाल्यास आपल्या करणी सेनेकडून सुरक्षा पुरवण्यात येईल आणि बिश्नोई गँगच्या गुंडांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आम्ही फक्त महादेवाला घाबरतो. लॉरेन्सला का घाबरायचे? तो 12 वर्षांपासून तुरुंगात आहे. त्याला जामिनही मिळालेला नाही. तुरुंगातून बाहेर पडलो तर ठार मारले जाण्याची त्यालाच भीती आहे. त्यामुळे तो तुंरुगातच आहे. ज्या दिवशी तो तुरुंगाबाहेर येईल त्या दिवशी आपण त्याला ठार मारू. तो दहशतवादी आहे, ज्या दिवशी तो तुरुंगातून बाहेर येईल आम्ही त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार करू, असेही शेखावत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;