धमाल रोड ट्रिपची कमाल गोष्ट… ‘श्री गणेशा’चा टिझर प्रदर्शित

धमाल रोड ट्रिपची कमाल गोष्ट… ‘श्री गणेशा’चा टिझर प्रदर्शित

Shri Ganesha: प्रेक्षकांना पोट धरुन हसवण्यासाठी ‘श्री गणेशा’ सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीत कायम विविध विषयांवर सिनेमे बनतात. या तुलनेत रोड मूव्हींची संख्या फार कमी आहे. त्यामुळेच अशा धाटणीचा एखादा सिनेमा आला की प्रेक्षकांच्या नजरा लगेच त्याकडे वळतात. याच कारणामुळे ‘श्री गणेशा’ हा नातेसंबंधांतील धम्माल गंमती-जंमतीवर आधारलेला मराठी फॅमिली एन्टरटेनर रोड मूव्ही घोषणा झाल्यापासून चर्चेत आहे.

‘श्री गणेशा’ सिनेमाचा टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अल्पावधीतच प्रेक्षकांनी ‘श्री गणेशा’च्या टिझरला लाईक करत त्यावर कमेंट्सही केल्या आहेत. थोडक्यात काय तर हास्य-विनोदाचा कल्ला करणारा ‘श्री गणेशा’चा टिझर प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. हा सिनेमा 20 डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

 

‘श्री गणेशा’ धमाल रोड ट्रीपचा आणि ‘श्री गणेशा’ फॅमिली एंटरटेनमेंटचा’ असे म्हणत सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. सिनेमात प्रथमेश परब आणि शशांक शेंडे यांनी सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे. मुख्य भूमिकेत झळकणाऱ्या प्रथमेश परब आणि शशांक शेंडे यांना दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी आजवर कधीही न दिसलेल्या रूपात मोठया पडद्यावर सादर केलं आहे. एवढंच नाही तर, प्रथमेशसोबत अभिनेत्री मेघा शिंदे हिची जोडी जमली आहे.

सिनेमा टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘टीझर तर छान आहे पिक्चर बघायला मजा येईल…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘टिकल्या… काम काय करतो… प्रेम करतो…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘सुपर डूपर…’ सध्या सर्वत्र ‘श्री गणेशा’ सिनेमाच्या टिझरची रंगली आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;