शिल्पा शेट्टीने स्वतःचा संसार थाटला आणि माझा मोडला…, सवतीचं शिल्पा शेट्टीला पत्र

शिल्पा शेट्टीने स्वतःचा संसार थाटला आणि माझा मोडला…, सवतीचं शिल्पा शेट्टीला पत्र

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचं नाव अनेक बॉलिवूड अभिनेत्यांसोबत जोडण्यात आलं. पण अभिनेत्रीचं नातं कोणासोबत लग्नापर्यंक पोहोचलं नाही. अखेर अभिनेत्रीने उद्योजक राज कुंद्रा याच्यासोबत लग्न केलं. शिल्पा ही राज कुंद्राची दुसरी पत्नी आहे. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर राज कुंद्रा याच्या आयुष्यात शिल्पा शेट्टी हिची एन्ट्री झाली. काही वर्ष राज – शिल्पा यांनी एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. शिल्पा – राज यांनी 22 नोव्हेंबर 2009 मध्ये लग्न केलं. पण दोघांच्या लग्नानंतर राज कुंद्रा यांच्या पहिल्या पत्नीने अभिनेत्रीवर गंभीर आरोप केलं.

शिल्पा शेट्टी हिची सवत आणि राज कुंद्राची पहिल्या बायकोने शिल्पावर संसार मोडल्याचं आरोप केले. शिल्पा शेट्टीने स्वतःचा संसार थाटला आणि माझा मोडला… असे आरोप राज कुंद्रा याची पहिली पत्नी कविता हिने शिल्पावर केला. यावर खुद्द शिल्पाने मोठं वक्तव्य केलं होतं.

शिल्पा म्हणाली, ‘राज याची पहिली पत्नी कविता हिने वर्षभरापूर्वी माझ्यामुळे तिचा संसार मोडला अशा चर्चा रंगल्या हेत्या. पण याचदरम्यान कविताचं मला पत्र देखील आलं होत. शिल्पामुळे आमचं लग्न मोडलं नाही… असं कविताने पत्रात लिहिलं होतं. राज आणि मला पती – पत्नीच्या नात्यात राहायचं नव्हतं…’ असं कविता पत्रात म्हणाली होती.

पुढे शिल्पा म्हणाली, ‘कविताने पत्र पाठवलं चांगलं झालं. पण कविताकडून पत्र आल्याची माहिती कधीच समोर आली नाही…’ असं देखील शिल्पा म्हणाली होती. सांगायचं झालं तर, राज कुंद्रा याच्यासोबत लग्न झाल्यानंतर शिल्पाला अनेक अडचणींचा समाना करावा लागला. पण अभिनेत्रीने कधीच राज याची साथ सोडली नाही.

आज शिल्पा पती राज कुंद्रा आणि दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. शिल्पा कायम सोशल मीडियावर मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट करत असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर शिल्पाच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.

राज कुंद्रा याची पहिली पत्नी

राज कुंद्रा याने लंडन येथील उद्योजकाची मुलगी कविता हिच्यासोबत केलं होतं. कविता आणि राज यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केलं. 2003 मध्ये कविता – राज यांनी लग्न केलं. लग्नानंतर कविताने गोंडस मुलीला जन्म दिला. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. 2006 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यांच्या मुलीचं नाव डेलिना असं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;