सुष्मिता सेनची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? अभिनेत्रीच्या वडिलांचा मोठा निर्णय

सुष्मिता सेनची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? अभिनेत्रीच्या वडिलांचा मोठा निर्णय

Happy Birthday Sushmita Sen: अभिनेत्री सुष्मिता सेन उत्तम अभिनेत्री तर आहेच, पण ती उत्तम आई देखील आहे. सुष्मिता सेन हिचा वाढदिवस असल्यामुळे अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याच्या चर्चा रंगल्या आहेत. वयाच्या 48 वर्षी देखील सुष्मिता अविवाहित आहे. पण अभिनेत्री वयाच्या 24 व्या वर्षी आई झाली. अभिनेत्रीने दोन मुलींना दत्तक घेतलं आहे. सुष्मिता हिने पहिली मुलगी रेनी हिला 2000 मध्ये दत्तक घेतलं तर, दुसरी मुलगी अलिसा हिला 2010 मध्ये दत्तक घेतलं. आता अभिनेत्री दोन मुलींसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

एक मुलाखतीत सुष्मिता हिने पहिल्या मुलील्या दत्तक घेतल्याबद्दल सांगितलं होतं. पहिल्या मुलीला दत्तक घेतलं तेव्हा सुष्मिता फक्त 21 वर्षांची होती. रेनी हिला दत्तक घेतल्यामुळे सुष्मिताची आई नाराज होती. पण अभिनेत्रीच्या वडिलांना सुष्मिताला पूर्ण पाठिंबा दिला.

सुष्मिता म्हणाली, ‘रेनीला दत्तक घेतल्यानंतर माझी आई म्हणाली, तू स्वतःच अद्याप लहान आहेस… तू काय करत आहेस… या मुलीसोबत काय वाईट झालं आहे? आई माझ्यावर नाराज होती. पण माझे वडील प्रचंड संयमी आहे…. वडिलांमुळे मी मुली दत्तक घेऊ शकली. वडिलांचा पाठिंबा होता म्हणून न्यायालयाने मला रेनी दिली… वडिलांशिवाय मी असं करु शकली नसती…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘भारताची व्यवस्था अतिशय विशिष्ट आहे. वडील नाही तर, वडिलांची छाया नाही आणि माझ्या वडिलांशिवाय दुसरा कोणता व्यक्ती योग्य नाही. न्यायालयानुसार, वडिलांची अर्धी प्रॉपर्टी मुलांच्या नावे करायची असते. माझ्या वडिलांनी सर्व काही माझ्या मुलीच्या नावावर केली. मला माझ्या वडिलांवर गर्व आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

एवढंच नाही तर, दुसऱ्या मुलीला दत्तक घेण्यासाठी सुष्मिताला तब्बल 10 वर्ष कोर्टाची पायरी चढावी लागली. भारताच्या कायद्यानुसार, जर एका मुलाली दत्तक घेतलं असेल तर, दुसऱ्या मुलीला दत्तक घेऊ शकत नाही. दुसऱ्या मुलाला दत्तक घेण्याचा कायदा आहे…. पण सुष्मिता हिला अलिसा हिला दत्तक घ्यायचं होतं. ज्यासाठी अभिनेत्रीने वडिलांच्या मदतीने 10 वर्ष कायद्याची लढाई लढली आणि अभिनेत्री जिंकली देखील…

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;