मला फार वाईट वाटतंय…..असित मोदी यांच्यासोबत भांडणाबाबत दिलीप जोशी यांनी दिली प्रतिक्रिया

मला फार वाईट वाटतंय…..असित मोदी यांच्यासोबत भांडणाबाबत दिलीप जोशी यांनी दिली प्रतिक्रिया

प्रसिद्ध मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा शोचे अभिनेते दिलीप जोशी यांची निर्माते असित मोदी यांच्यासोबत भांडण झाल्याची बातमी फेटाळली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, ही बातमी खोटी असून या शोवर जळणाऱ्यांनी अशा बातम्या पसरवल्या आहेत. मालिकेशी जोडलेल्या एका सोर्सच्या हवाल्याने दोघांचा सुट्टीवरुन वाद झाल्याची बातमी बातमी आली होती. वाद इतका पेटला होता की, दिलीपने असित यांच्या थेट कॉलरला हात घातला होता.पण आता दिलीप जोशी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, ज्या अफवा पसरत आहेत त्या मी क्लीअर करु इच्छित आहे. माध्यमांमध्ये माझ्याविषयी आणि आसिद यांच्याविषयी काही बातम्या येत आहेत. त्या पूर्णपणे खोट्या आहेत. मला फार वाईट वाटतंय की, अशा प्रकारच्या बातम्या चालवल्या जात आहेत. वाईट म्हणजे त्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. तेही या गोष्टीवर की ज्यांनी मला इतके वर्ष काम करण्याची संधी दिली. दरवेळी काहीतरी अफवा येतात आणि आम्हाला सातत्याने त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागते की ते संपूर्ण खोटे आहे. आम्ही थकलो आहोत अशाप्रकारच्या बातम्यांनी आता. या बातम्यांचा टिटकारा येऊ लागला आहे. हे आमच्यासाठीच नाही तर आमच्या चाहत्यांसाठी जे आमच्या या शो वर प्रेम करतात आणि हे सर्व वाचून निराश होतात.

दिलीप जोशी म्हणाले की, याआधीही मी हा शो सोडत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या, जे पूर्णपणे खोटे आहे. पण आता वाटते की, दर काही आठवड्यानंतर नवीन काहीतरी अफवा येते आणि असित यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. काही वेळेला वाटते की शो च्या यशामुळे लोकं जळतात आणि असे कृत्य करतात.

न्यूज 18च्या वृत्तानुसार, शो शी जोडलेल्या सोर्सने सांगितले की, दिलीप जोशी आणि असिद मोदी यांच्यात ऑगस्टमध्ये भांडण झाले होते. दिलीप यांना सुट्ट्या हव्या होत्या आणि असित यावर काहीच बोलत नव्हते. अखेर संतापलेल्या दिलीप यांनी त्याची कॉलर जाऊन पकडली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;