हे गृहस्थ कोण… प्रचारासाठी आलेल्या कंगनाने उमेदवार, बावनकुळेंनाच ओळखले नाही

हे गृहस्थ कोण… प्रचारासाठी आलेल्या कंगनाने उमेदवार, बावनकुळेंनाच ओळखले नाही

बॉलीवूड अभिनेत्री व खासदार कंगना रणौतचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्या भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी कंगना गेली होती, त्या उमेदवाराला तिने ओळखले नाही. हे गृहस्थ कोण, असा सवालच तिने केला. कंगना रणौत नागपूरच्या कामठी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रचारासाठी आली होती. प्रचारादरम्यानचा कंगनाचा व्हिडीओ काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. व्हायरल व्हिडीओनुसार, कंगना तिच्या शेजारी उभ्या असलेल्या एका कार्यकर्तीला विचारते की, ही व्यक्ती कोण आहे? त्यावर हे चंद्रशेखर बाकनकुळे असून ते या जागेवरील उमेदवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, असे तिला सांगण्यात येते. बावनकुळेही मी भाजपचा उमेदवार आहे, असे सांगताना दिसत आहेत. कंगनाचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;