अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप, मिस्ट्री मॅनसोबत मलायका अरोरा हॉटेलच्या बाहेर स्पॉट, Video तुफान व्हायरल

अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप, मिस्ट्री मॅनसोबत मलायका अरोरा हॉटेलच्या बाहेर स्पॉट, Video तुफान व्हायरल

Malaika Arora: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिने अधिक सिनेमांमध्ये काम केलं नाही. पण मलायका कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. आता देखील मलायका तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेता अर्जुन कपूर हिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायका एका हॉटेल बाहेर मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली आहे. सध्या मलायकाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सांगायचं झालं तर, अर्जुन कपूर याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायका तिचा मुलगा अरहान खान याच्यासोबत अधिक दिसते. पण आता समोर आलेला व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा प्रश्न पडला आहे. अर्जुन याची साथ सुटल्यानंतर मलायका कोणासोबत वेळ व्यतीत करत आहे.

सोशल मीडियावर मलायकाचा मिस्ट्री मॅनसोबत व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये मलायका हिने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि ब्राउन रंगाची पँट घातली आहे. व्हिडीओमध्ये मिस्ट्री मॅन, मलायकाचा हात धरुन चाहताना दिसत आहे. डिनर डेट दरम्यान दोघांना स्पॉट करण्यात आलं आहे .

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Filmymantra Media (@filmymantramedia)

 

मलयाका सोबत दिसणारा मिस्ट्री मॅन कोण आहे याबद्दल अद्याप कोणतीच अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘मलायकाला दुसरा कोणीतरी भेटला वाटतं…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘आता हा आहे तरी कोण?’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘अन्य पुरुषासोबत प्रेम झालं आहे…’ सध्या सर्वत्र मलायका सोबत दिसणाऱ्या मिस्ट्री मॅनची चर्चा रंगली आहे.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा दोघांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून दोघे एकत्र दिसले नाहीत. शिवाय अर्जुनच्या वाढदिवशी देखील मलायका अभिनेत्यासोबत नव्हती. ज्यामुळे दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी अधिक जोर धरला. त्यानंतर खुद्द अर्जुन याने सिंगल असल्याची घोषणा केली. ‘मी सिंगल आहे आणि आनंदी आहे…’ असं अभिनेता म्हणाला. यावर मलयाकाची कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;