50 खोकेवाल्या गद्दारांना निवडणुकीत धडा शिकवा! मल्लिकार्जुन खरगे यांचे आवाहन

50 खोकेवाल्या गद्दारांना निवडणुकीत धडा शिकवा! मल्लिकार्जुन खरगे यांचे आवाहन

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी केले. आता विधानसभा निवडणुकीतही 50 खोकेवाल्या गद्दारांना धडा शिकवून भाजपचा सुपडा साफ करा आणि महाविकास आघाडीला बहुमताने विजयी करा, असे आवाहन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केले.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची वसई येथे प्रचार सभा झाली. बटेंगें तो कटेंगे, एक हैं तो सेफ हैं या भाजपच्या घोषणांचा समाचार घेत खरगे म्हणाले की, महाराष्ट्राची वाटचाल छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर सुरू आहे; पण काही लोकांना जातीधर्मांमध्ये भांडणे लावायची आहेत.

भाजप युती सरकारच्या राजवटीत शेतकरी, कामगार, तरुण, महिला यांचे जगणे कठीण झाले आहे. महागाई व बेरोजगारी प्रचंड वाढली आहे, शेतमालाला भाव नाही. भाजप महायुती सरकारने अडीच वर्षांत प्रचंड भ्रष्टाचार करून महाराष्ट्राला लुटले आहे. काँग्रेसच्या 5 गॅरंटी व महाराष्ट्रनामामध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता महाविकास आघाडी करेल असे सांगून, 20 तारखेला जनताच भ्रष्ट भाजप महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, असा विश्वास यावेळी मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;