प्रचाराच्या तोफा थंडावल्या! रात्र वैऱ्याची, जागते रहो.. उमेदवारांची कार्यकर्त्यांना सावधान राहण्याची सुचना

प्रचाराच्या तोफा थंडावल्या! रात्र वैऱ्याची, जागते रहो.. उमेदवारांची कार्यकर्त्यांना सावधान राहण्याची सुचना

गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. प्रचाराच्या काळात एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात आल्या. दरम्यान  सोमवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. आज रात्रीपासून छुप्या प्रचाराला सुरुवात होणार असून रात्र वैऱ्याची आहे, जागे रहा असा सल्ला उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

15 ऑक्टोबर रोजी आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजले. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरणे, प्रचारसभा, प्रचारफेऱ्या यांनी निवडणूकीचे वातावरण पेटले होते. प्रचारसभांमधून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या. सुमारे ३४ दिवस ही प्रचार यंत्रणा राबल्यानंतर आज सायंकाळी पाचनंतर प्रचाराच्या तोफा थंडावल्या. आज रात्रीपासून छुप्या प्रचाराला सुरुवात होणार असून कार्यकर्त्यांना डोळ्यात तेल घालून पहारा द्यावा लागणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 यावेळेत मतदान होणार आहे. जिल्ह्यातील ५ विधानसभा मतदार संघात 1 हजार ७४७ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;