‘आई तुळजाभवानी’ मालिकेत उलगडणार नवा अध्याय, प्रेक्षकांना समजणार चिंतामणी पाषाणाचा अद्भुत महिमा अन् रहस्य

‘आई तुळजाभवानी’ मालिकेत उलगडणार नवा अध्याय, प्रेक्षकांना समजणार चिंतामणी पाषाणाचा अद्भुत महिमा अन् रहस्य

‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत आज एक नवा अध्याय उलगडणार आहे. देवीने मडक्यात बंदिस्त केलेले दैवत्व, चुकीच्या हाती जाऊन विध्वंस होऊ नये म्हणून ब्रह्मदेव आणि विष्णुदेव यांच्या विनंतीवरून तुळजाने ते परत स्वीकारलं आणि अष्टभुजेस्वरूप धारण केलं. मात्र, या प्रवासात देवीने स्पर्श केलेला पाषाण प्रकाशमान होतो आणि पुढे तो चिंतामणी पाषाण म्हणून ओळखला जातो. या पाषाणाचा अगाध महिमा आणि त्याचं रहस्य आज प्रेक्षकांना समजणार आहे. याआधी सधवा आणि विधवा हा सनातन सुरू असलेला वादाचा मुद्दा आई तुळजाभवानीने खूप सोप्या शब्दांत सोदाहरण समजावून सांगितला. तसंच देवीने स्त्रीत्वाच्या सन्मानाचा मुद्दा भक्तांसमोर मांडला. जो प्रत्येक स्त्रीला बळ देणारा ठरला. ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत या आठवड्यात दैवत्वाचा प्रवास आणि चिंतामणी पाषाणाचा अनमोल ठेवा अनुभवता येणार आहे. चिंतामणी पाषाणाचा अगाध महिमा 20 नोव्हेंबरपासून रात्री 9 वाजता ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत पहायला मिळणार आहे.

चिंतामणी पाषाण हा हिंदू धर्मातील श्रद्धेचा आणि भक्तीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. चिंतामणी म्हणजे चिंता दूर करणारा, मनातील इच्छा पूर्ण करणारा पाषाण. हा पाषाण देवी तुळजाभवानीच्या कथा आणि दैवी चमत्कारांशी जोडला गेलेला आहे. चिंतामणी पाषाणाला दैवी ऊर्जा आणि देवीची उपस्थिती दर्शवणारे मानलं जातं. त्याला स्पर्श करून मनोकामना व्यक्त केल्यास ती पूर्ण होते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. चिंतामणी हा केवळ पाषाण नाही, तर तो विश्वास, श्रद्धा आणि भक्तीचा आधार आहे. देवी तुळजाभवानीची कृपा आणि तिच्या दैवी स्वरूपाचं ते प्रतीक मानलं जातं. देवी भक्तांसाठी अत्यंत श्रद्धेचा हा कथाभाग असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये त्याची विशेष उत्सुकता आहे. आई तुळजाभवानीच्या अश्या असंख्य लीला आणि दैवी चमत्कार या मालिकेत पाहायला मिळत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

‘आई तुळजाभवानी’ ही पौराणिक मालिका काही दिवसांपूर्वीच सुरू झाली असून अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. ‘आई तुळजाभवानी’च्या रुपात अभिनेत्री पूजा काळे प्रेक्षकांच्या भेटीला आली. तिच्या सोज्वळ आणि सात्विक रुपाने महाराष्ट्राचं मन जिकलं आणि ‘आई तुळजाभवानी’च्या रुपात तिला आपलंसं केलं. या मालिकेच्या माध्यमातून तुळजाभवानी मातेचे अद्भुत चमत्कार आणि संकटांमधून पृथ्वीवरील भक्तांचे रक्षण करण्याचे प्रसंग दाखवण्यात आले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;