शिवतीर्थावरील सभेत त्यांचं मन आणि हृदय सुद्धा रिकामं होतं! आदित्य ठाकरे यांचा मोदींना टोला

शिवतीर्थावरील सभेत त्यांचं मन आणि हृदय सुद्धा रिकामं होतं! आदित्य ठाकरे यांचा मोदींना टोला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांची ‘मातोश्री’ येथे पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेतून आदित्य ठाकरे यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले. यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिवतीर्थावरील सभेचाही उल्लेख केला. शिवतीर्थावरील सभेत त्यांचं मन आणि हृदय सुद्धा रिकामे होते, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा शिवतीर्थावर पार पडली, या सभेविषयी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘जिथे माझ्या आजोबांचे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृति स्थळ आहे, त्या ठिकाणी त्यांची सभा घेण्याची हिंमत झाली. तिथे एवढी मोठी सभा आयोजित केली, पण खुर्च्या रिकाम्या होत्या, फक्त खुर्च्या रिकाम्या नव्हत्या तर त्यांचे मन आणि हृदय सुद्धा रिकाम होते’.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;