2 कोटी दे अन्यथा कुटुंबियांना… यूट्यूबर सौरव जोशीला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी

2 कोटी दे अन्यथा कुटुंबियांना… यूट्यूबर सौरव जोशीला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी

सलमान खाननंतर आता देशातील प्रसिद्ध यूट्यूबर सौरभ जोशी याला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमकी मिळाली आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या वतीने सौरभ जोशी याच्याकडे 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली असून तसे न केल्यास कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

सौरभ जोशी हा प्रसिद्ध युट्युबर असून तो उत्तराखंडच्या हल्दवानी येथील रहिवासी आहे. त्याने याबाबत हल्दवानी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. त्याला धमकीचे पत्र मिळाले आहे. या पत्रात लिहीले आहे की, हॅलो सौरव जोशी, माझे नाव करण बिश्नोई असून मी बिश्नोई टोळीचा सदस्य आहे. तुला महत्वाची माहिती देण्यासाठी पत्र पाठवले आहे. आमचे बॉस लॉरेन्स बिश्नोई यांनी तुला आमच्या टोळीला दोन कोटी रुपये रोख द्यायला सांगितले आहेत. पैसे न दिल्यास तुला किंवा तुझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला ठार मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत असे लिहीले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;