‘फायर नहीं, वाइल्ड फायर…’, पुष्पा चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस

‘फायर नहीं, वाइल्ड फायर…’, पुष्पा चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2: द रूल’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरसाठी चाहते खूप उत्सुक होते. अखेर त्यांची प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली आहे. काल सायंकाळी या चित्रपटाचा ट्रेलर ‘Mythri Movie Makers’ आणि T – series च्या यूट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटांमध्ये दमदार संवाद आहे. अल्लू अर्जुनचा उत्कृष्ट अभिनय या ट्रेलर मध्ये पाहायला मिळतो आहे. हा चित्रपट येत्या 5 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आता हा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

चित्रपट 2000 कोटींची कमाई करणार, चाहत्यांची कमेंट

पुष्पा चित्रपटाचे डायलॉग ऐकून चाहते अल्लू अर्जुनचे कौतुक करत आहे. यावर एकाने ‘पुष्पा… पुष्पराज हरगिज झुकेगा नहीं साला’ अशी कमेंट केली आहे. ‘फायर नहीं, वाइल्ड फायर है अपना पुष्पा’ असे एकाने म्हटले आहे. तर दुसऱ्या एका चाहत्याने ‘अल्लू अर्जुन की आर्मी यहां जुड़ जाएं’ अशीही एकाने कमेंट केली आहे. तर एकाने हा चित्रपट 2000 कोटींची कमाई करेल, ट्रेलर इतका मस्त असेल तर चित्रपट किती मस्त असेल, अशाही कमेंट केल्या आहेत.

पुष्पा राज आणि श्रीवल्ली यांचा जबरदस्त अंदाज

‘पुष्पा 2’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर असे म्हणता येईल की, पुष्पा राज पुन्हा एकदा धमाल करणार आहे. ट्रेलरमध्ये अनेक संवाद ऐकायला मिळतात. जे चित्रपट गृहामध्ये खूप टाळ्या आणि शिट्ट्या वाजवायला प्रेक्षकांना भाग पडणार आहे. या चित्रपटांमध्ये पुष्पा राज आणि श्रीवल्ली यांचा जबरदस्त अंदाज पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर याची चर्चा पाहायला मिळत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला आहे. या ट्रेलरला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. या ट्रेलरची सुरुवात अल्लू अर्जुन म्हणजेच पुष्पाच्या एन्ट्रीने होत आहे. त्याच्या बॅकग्राऊंडला “उसे ना पैसों की परवाह है और ना ही पावर का खौफ है” असा डायलॉग ऐकू येतो. यानंतर ट्रेलरमध्ये एका मागून एक दमदार संवाद ऐकायला मिळतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;