Kashmera Shah Accident – कश्मीरा शाहचा भीषण अपघात, फोटो शेअर करत दिली माहिती

Kashmera Shah Accident – कश्मीरा शाहचा भीषण अपघात, फोटो शेअर करत दिली माहिती

कॉमेडीयन कृष्णा अभिषेक याची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री कश्मीरा शाहचा मोठा अपघात घडला आहे. तिने सोशल मीडियावर अपघाताचे फोटो शेअर केले आहे. यामध्ये रक्ताने भरलेले कपडे दिसत आहेत. शिवाय तिने फोटोसोबत हा अपघात किती भयंकर होता याचा अंदाज लावला जाऊ शकतो असे लिहीले आहे.

कश्मीराने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, त्या फोटोमध्ये तिने गाडीतील सीटवर रक्ताने माखलेला कपडा दिसत आहे. शिवाय या फोटोसह तिने पोस्ट लिहीली आहे. कश्नीराने इंस्टाग्राम लिहीले आहे की, थॅक यू देवा मला वाचविण्यासाठी. खूप भयंकर अपघात होता. काहीतरी भयंकर होणार होते पण थोडक्यावर निभावले. आशा आहे की कोणतेही डाग नसतील. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण एकावेळी जगा. परत येण्याची वाट पाहू शकत नाही. आज मला माझ्या कुटुंबाची खूप आठवण येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kashmera Shah (@kashmera1)

कश्मिराच्या या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटी सतत कमेंट करत आहेत. कृष्णा अभिषेकनेही कमेंट करत लिहिले- देवाचे आभार मानतो की तू सुरक्षित आहेस. अभिनेत्री किश्वर मर्चंटला विचारले तू ठीक आहेस ना? दीपशिखा नागपालने लिहिले- लवकर परत ये. तनाज इराणीने लिहिले- ओएमजी हे खूप भयंकर आहे. चाहतेही कश्मीराची प्रकृती बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करत आहेत. अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया तिच्या पोस्टवर येत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;