नवऱ्याने फसवणूक केल्यानंतर कपूर कुटुंबाची सून म्हणते, ‘संसार केला फक्त मुलांसाठी कारण…’

नवऱ्याने फसवणूक केल्यानंतर कपूर कुटुंबाची सून म्हणते, ‘संसार केला फक्त मुलांसाठी कारण…’

Kapoor Family: कपूर कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या करणामुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून कपूर कुटुंबाचा मुलगा आणि अभिनेता संजय कपूर याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. आज संजय त्याच्या बायको आणि मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा होता जेव्हा संजय याने पत्नी महीप हिची फसवणूक केली होती. ज्यामुळे महीप हिने घर सोडून गेली होती.

अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूरने 2022 मध्ये ‘फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स’ या नेटफ्लिक्सवरील वेब सीरिजमध्ये तिच्या खासगी आयुष्याविषयी खुलासा केला होता. संजयने नात्यात फसवणूक केल्याचं तिने सांगितलं होतं. संजय आणि महीप यांनी 1997 मध्ये लग्न केलं. लग्नानंतर दोघांच्या आयुष्यात अनेक अडचणी देखील आल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Maheep Kapoor (@maheepkapoor)

खासगी आयुष्याबद्दल महीप म्हणाली, ‘माझ्या लग्नाच्या सुरुवातील संजय प्रचंड बेजबाबदार होता. म्हणून मुलगी शनाया हिच्यासोबत मी घर सोडलं. मी स्वत:साठी तो निर्णय घेतला होता. पण माझ्या हातात नुकतीच जन्मलेली मुलगी होती. त्यानंतर मी दुसऱ्या मुलाला जन्म दिला.’
‘एक महिला म्हणून आणि एक आई म्हणून मी मुलीला प्राधान्य दिलं आणि वडिलांपासून मी मुलांना दूर देखील करू शकत नव्हती. संजयसोबत असलेलं पती – पत्नीचं नातं मला टिकवायचं होतं. हे सर्व मी फक्त माझ्या मुलांसाठी करत होती. ही कोणती तडजोड नाही…’ असं देखील महीप म्हणाली.

‘संजय सोबत असलेलं नातं मी तोडलं असतं तर, आज मला पश्चाताप झाला असता. कारण आज जेव्हा माझी मुलं माझ्या घरी येतात, माझे पती घरी येतात तेव्हा त्यांच्यासाठी घर आनंददायी ठिकाण असतं. कोणतीही मदत लागली तर आपले आईवडील आपल्यासोबत आहेत, याची जाणीव कायम मुलांना असायला हवी.’ असं देखील महीप मुलाखतीत म्हणाली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;