जयपूरमध्ये अभिनेत्री वाणी कपूरचा अपघात, पोलिसांच्या गाडीला धडकली

जयपूरमध्ये अभिनेत्री वाणी कपूरचा अपघात, पोलिसांच्या गाडीला धडकली

सिनेसृष्टीमधून चाहत्यांसाठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री वाणी कपूरचा रविवारी 17 नोव्हेंबर रोजी सकाळी जयपूरमध्ये अपघात झाला. ती तिच्या एका सिनेमाच्या शूटिंगसाठी जयपूरमध्ये गेली होती. परकोटाच्या बापू बाजारात काही सीन शूट होत होते. त्याचवेळी तिची स्कूटर शेजारी उभ्या असलेल्या पोलिसांच्या गाडीला धडकली.

दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, या सिनेमाचा एक सीन शूट होणार होता ज्यामध्ये वाणी कपूरला स्कूटी शिकायची होती. वाणी कपूर परकोटाच्या बापू बाजारात फिरतानाचे सीन शूट करत होती. दरम्यान वाणीचा स्कूटर शिकत असताना ताबा गेला आणि ती पोलिसांच्या गाडीला धडकली. या घटनेमुळे निर्माते घाबरले आणि संपूर्ण टीम अभिनेत्रीच्या दिशेने धावली. मात्र सुदैवाने वाणीला काहीही झाले नसले ती पूर्णपणे बरी आहे आणि तिला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. आता हा सीन सोमवारी 18 नोव्हेंबरला शूट होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

वाणी कपूर सध्या तिचा आगामी ‘अबीर गुलाल’मुळे चर्चेत आहे.या सिनेमाच्या शुटीग दरम्यान हा अपघात झाला. या सिनेमात तिच्यासोबत पाकिस्तानी अभिनेता फवाद खान दिसणार आहे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;