महाराष्ट्र काँग्रेसची ‘भ्रष्टयुती’ विरोधात कॉमिक-शैलीतील जाहिरात मोहीम

महाराष्ट्र काँग्रेसची ‘भ्रष्टयुती’ विरोधात कॉमिक-शैलीतील जाहिरात मोहीम

महाराष्ट्र काँग्रेसने आज वृत्तपत्रांमध्ये कॉमिक-स्ट्रीप-शैलीतील जाहिरात मोहीम प्रसिद्ध करून महायुती आघाडीवर जोरदार हल्ला केला आहे. या मोहिमेत गेल्या दोन-दीड वर्षांत घडलेल्या विविध घोटाळ्यांवर, गैरव्यवस्थापनावर आणि महाराष्ट्रविरोधी कृतींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

या जाहिरातीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकल्पातील भ्रष्टाचार, बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था, महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष, 90 टक्के अपूर्ण आश्वासनं, महाराष्ट्रातील साडे सात लाख कोटींचे प्रकल्प गुजरातला हस्तांतरित होणे, शेतकरी आत्महत्या आणि वाढत्या बेरोजगारीसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

याशिवाय, या मोहिमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पंतप्रधान मोदींसमोर नमवले असल्याचे दाखवण्यात आले आहे. महायुती सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी उभे राहण्यात कशी अपयशी ठरली यावर जाहिरातीत भर देण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;