उद्धव ठाकरे यांची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या संघ कार्यकर्त्यास अटक

उद्धव ठाकरे यांची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या संघ कार्यकर्त्यास अटक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सोशल मीडियावर अश्लील कॉमेंट व आक्षेपार्ह चित्र पोस्ट करून त्यांची बदनामी करणाऱ्या संघाच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक केली आहे. धर्मेंद्र बिसेन असे त्याचे नाव असून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निष्ठावंत शिवसैनिकांनी पोलिसांकडे केली आहे.

सध्या राज्यात सर्वत्र निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पण उल्हासनगरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्मेंद्र बिसेन याने मात्र अक्षरशः कळस गाठला. त्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बदनामीकारक मजकूर फेसबूक व व्हॉट्स अॅपवर टाकला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक व निष्ठावंत शिवसैनिक दिलीप मालवणकर यांच्यासह विशाल सोनवणे तसेच प्रहार संघटनेचे अॅड. स्वप्नील पाटील यांना ही बाब समजली. या सर्वांनी तातडीने विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठून मस्तवाल धर्मेंद्र बिसेन याच्याविरोधात तक्रार केली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;