महिलांच्या सुरक्षेसाठी महाविकास आघाडीला साथ द्या ! कल्याणमध्ये उल्का महाजन यांचे आवाहन

महिलांच्या सुरक्षेसाठी महाविकास आघाडीला साथ द्या ! कल्याणमध्ये उल्का महाजन यांचे आवाहन

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. राज्यात सर्वच घटक असमाधानी आहेत. भयमुक्त वातावरण हवे असेल तर महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे महाविकास आघाडीला साथ द्या आणि विधानसभा निवडणुकीत विजयी करा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य भारत जोडो अभियानाच्या समन्वयक उल्का महाजन यांनी केले. महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण पश्चिमचे उमेदवार सचिन बासरे यांच्या प्रचारासाठी आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या.

कल्याणच्या गीता हॉल येथे मेळावा झाला. यावेळी बोलताना उल्का महाजन यांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्या राज्यात महिला, बालके, कष्टकरी यांच्यावर अन्याय होतो तेथील सत्ताधाऱ्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. राज्यात महिलांवर अत्याचार वाढत आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी महाविकास आघाडीची सत्ता आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महिलांच्या शिक्षण, रोजगार आणि सुरक्षिततेच्या दिशेने महत्त्वपूर्ण योजना राबवण्याचे आश्वासन महाविकास आघाडीने दिले आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस धोरण निवडणूक अजेंड्याचा केंद्रबिंदू असल्याने राज्यात सत्ता परिवर्तन होईल, असा विश्वासही उल्का महाजन यांनी व्यक्त केला. कल्याणसह पश्चिममध्ये सचिन बासरे यांच्या नावासमोरील मशाल चिन्हाचे बटन दाबून त्यांना विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;