मी चोरी करायला आलीये का? बारामती टेक्सटाईल पार्कच्या गेटवर अडवल्यावर प्रतिभा पवारांचा संताप

मी चोरी करायला आलीये का? बारामती टेक्सटाईल पार्कच्या गेटवर अडवल्यावर प्रतिभा पवारांचा संताप

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि त्यांची नात खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांना बारामती टेक्सटाईल पार्कच्या गेटवर रोखण्यात आले. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवण्यात आलं होतं. अर्ध्या तासानंतर त्यांना आतमध्ये सोडण्यात आलं आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयाकडून या संदर्भातील हा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला. दरम्यान, गेटवर अडवल्यानंतर प्रतिभा पवार चांगल्याच संतापल्या. त्यांनी गेटवरील सुरक्षारक्षकाला विचारणा केली. प्रतिभा पवार म्हणाल्या, तुम्ही गेट का बंद केलं? आम्हाला पाहून गेट बंद केलं का? तुम्हाला कुठून फोन आला? कोणाचा फोन आला? आतमध्ये सगळं सुरू आहे की बंद आहे? आतमध्ये सगळं सुरू आहे तर मग अडवत का आहात? आम्ही चोरी करायला थोडीच आलो आहोत. आम्हाला इथे खरेदी करायची आहे. ज्यांनी बंद करायला सांगितले आहे, त्यांना सांगा आम्हाला खरेदी करायची आहे. गेटवरील सुरक्षारक्षक साहेबांनी सांगितल्यामुळे मी गेट बंद केले आहे. माझी तेवढीच ड्युटी आहे, असे व्हिडीओमध्ये सांगत असल्याचे दिसत आहे.

आईला अडवल्यानंतर सुप्रिया सुळेही संतापल्या

सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझी आई प्रतिभा पवार, माझी मुलगी रेवती सुळे. या दोघी बारामतीतल्या टेक्सटाईल पार्कमध्ये गेल्या होत्या. त्या ठिकाणी त्यांना अर्धा तास थांबून ठेवण्यात आल्याची मला माहिती कळाली आहे. ज्या शरद पवारांनी बारामतीत हा पार्क उभा केला, त्या शरद पवारांच्या पत्नीला अर्धा तास त्या ठिकाणी थांबवलं जातं. आता सत्ता आहे म्हणून हे ठीक आहे, ते लोकांना कसेही वागवू शकतात. दरम्यान, अर्धा तास वाट पाहिल्यानंतर प्रतिभा पवार यांना बारामती टेक्सटाईल पार्कच्या गेटमधून आत सोडण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;