शिवसेना असेपर्यंत कुणीही मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही! विक्रोळीतील प्रचार सभेत संजय राऊत यांचा मोदी-शहा यांना इशारा

शिवसेना असेपर्यंत कुणीही मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही! विक्रोळीतील प्रचार सभेत संजय राऊत यांचा मोदी-शहा यांना इशारा

राज्यातील रोजगार, उद्योग-धंदे गुजरातला पळवले जातायत. मुंबई लुटून अदानीच्या घशात घातली जातेय. असे असताना मिंधे सरकारमध्ये बसलेले लाचार, डरपोक मात्र तोंडात मूग गिळून गप्प आहेत. शिवसेना असेपर्यंत आपल्याला मुंबई या महाराष्ट्रापासून तोडता येणार नाही ही भीती असल्याने मोदी-शहा यांनी आधी शिवसेना तोडली, मग मुंबई तोडण्याचा विचार केला. शिवसेनेवर कितीही घाव घातले तरी आम्ही सगळे निष्ठावंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. मोदी आणि शहा या व्यापाऱयांच्या शंभर पिढय़ा खाली उतरल्या तरी मुंबई व महाराष्ट्र त्यांना तोडता येणार नाही, असा इशारा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिला.

विक्रोळी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचे उमेदवार सुनील राऊत यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन केले होते, त्या वेळी ते बोलत होते. या सभेला काँग्रेसचे नेते भाई जगताप, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील, खासदार संजय दिना पाटील यांच्यासह काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रॉय मनी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष धनंजय पिसाळ, माजी नगरसेविका मनीषा रहाटे, ताजवंती शेट्टी, आशा अचन उपस्थित होते. यावेळी जमलेली प्रचंड गर्दी पाहून संजय राऊत म्हणाले, लोकसभा निवडणुकीपासून राज्यात तुफान आले असून हे तुफान 40 गद्दारांना राज्यातून उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.

राज ठाकरेंनी त्यांच्या सभेत माझ्यासाठी रिकामी खुर्ची ठेवली. मग मी ठरवलं आपण त्यांच्यासाठी खाट ठेवूया. कारण 23 तारखेला आपण त्यांची खाट टाकणारच आहोत. आम्ही बाळासाहेबांचे कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहोत. आम्ही आमची निष्ठा, इमान विकलं नाही. आम्हाला ईडी घेऊन गेली म्हणून घाबरलो नाही. तुम्हाला ईडीने एकदा बोलवलं तर तुम्ही दोन वर्षं कोमात गेलात, असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला.

राज ठाकरे महाराष्ट्राच्या दुश्मनांची दलाली करतायत

विक्रोळीत सुनील राऊत यांचा प्रचंड मताधिक्याने विजय होणारच, असा विश्वास व्यक्त करताना खासदार संजय राऊत म्हणाले, सुनील राऊत यांच्या विरोधात येथे उमेदवार मिळत नव्हता. तरीही विरोधकांना हरण्याची खुमखुमी आहे. काल परवा गोविंदा येथे नाचून गेला. मुख्यमंत्री येऊन जाऊन असतात. फडणवीसांच्या आदेशाने राज ठाकरे दोन वेळा येऊन गेले. राज्यात अनेक गंभीर प्रश्न असताना त्यावर बोलायचे सोडून राज ठाकरे फक्त माझ्यावर टीका करतात. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ज्या मोदी-शहा यांनी तोडली, फोडली आणि विकत घेतली, त्यांच्याविषयी राज ठाकरे यांना ममत्व असेल तर तुम्ही महाराष्ट्राच्या दुश्मनांची दलाली करताय, असा सणसणीत टोलाही त्यांनी राज ठाकरे यांना लगावला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;