नवऱ्याने माझ्यावर वेश्याव्यवसाय…, ‘बडे अच्छे लगते है’ फेम अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य

नवऱ्याने माझ्यावर वेश्याव्यवसाय…, ‘बडे अच्छे लगते है’ फेम अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य

Bade Achhe Lagte Hain fame Actress: ‘बडे अच्छे लगते है’ मालिकेने चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. मालिकेतील अभिनेते राम कपूर आणि साक्षी तन्वर यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. मालिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळाल्यामुळे मालिकेतील इतर कलाकारांच्या लोकप्रितेत देखील मोठी वाढ झाली. मालिकेत साक्षी तन्वर हिच्या बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री चाहत खन्ना हिच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली. पण मालिकेनंतर चाहत प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आली.

चाहत खन्ना हिच्या खासगी आयुष्याबद्दल फार कोणाला माहिती नाही. पण एका मुलाखतीत चाहत हिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा केला होता. चाहत हिने 2013 मध्ये फरहान मिर्झा याच्यासोबत लग्न केलं होतं. पण लग्नाच्या काही वर्षांनंतर अभिनेत्रीने नवऱ्यावर गंभीर आरोप केले. नवऱ्याच्या जाचाला कंटाळून अभिनेत्रीने 2018 मध्ये घटस्फोटाची घोषणा केली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Chahatt khanna (@chahattkhanna)

 

चाहत खन्ना आणि फरहान मिर्झा यांना दोन मुली देखील आहे. पण घटस्फोटानंतर मुली अभिनेत्रीसोबत राहतात. एका मुलाखतीत चाहतने धक्कादायक खुलासा केलेला, ‘मी फक्त आर्थिक परिस्थितीचा सामना करत नव्हती, तर शारीरिक आणि मानसिक रित्या देखील माझा छळ व्हायचा…’

‘माझा नवरा माझ्यावर सतत वेश्याव्यवसाय करत असल्याचा आरोप करायचा… माझे अभिनेत्यासोबत प्रेमसंबंध आहेत… असा त्याचा समज होता. लग्नानंतर मला धर्म बदलावा लागला. मी प्रत्येक धर्माचा आदर करते. पण इस्लाम धर्माचा देखील मी आदर करते. मी आई कालीची भक्त आहे…’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Chahatt khanna (@chahattkhanna)

 

‘लग्नानंतर मी धर्म बदलला. इस्लाम धर्माबद्दल देखील मी अनेक गोष्टी जाणून घेतल्या. पण आता माझ्या सनातन धर्मात मी आनंदी आहे. माझा नवरा इतका निर्दयी होती की, मी कोणत्या पार्टीमध्ये गेली तरी त्याला वाटयचं माझं अफेअर सुरु आहे…’ असं चाहत स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल म्हणाली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;