पाटण्यात पुष्पा-2 च्या ट्रेलर लॉन्चिंगवेळी गर्दी अनियंत्रित, पोलिसांनी केला लाठीचार्ज; व्हिडिओ आला समोर

पाटण्यात पुष्पा-2 च्या ट्रेलर लॉन्चिंगवेळी गर्दी अनियंत्रित, पोलिसांनी केला लाठीचार्ज; व्हिडिओ आला समोर

बिहारमधील पाटणा येथील गांधी मैदानावर पुष्पा-2 च्या ट्रेलर लॉन्चिंगवेळी गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करत लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा आगामी चित्रपट ‘पुष्पा 2’ चा ट्रेलर पाटणा येथील गांधी मैदानावर लॉन्च करण्यात आला. दोन्ही सुपरस्टार रविवारी पाटणा विमानतळावर पोहोचले. जिथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

गांधी मैदानावर पुष्पा-2 च्या ट्रेलर लॉन्चिंगवेळी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. संपूर्ण मैदान अल्लू अर्जुनच्या चाहत्यांनी खचाखच भरले होते. दरम्यान, जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.

येथील गांधी मैदानाच्या मुख्य रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वाहतूक कोंडीमुळे चिल्ड्रन पार्क ते जेपी गोलांबर हा रस्ता बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आला. गांधी मैदानाचे गेट क्रमांक 4 देखील गर्दीमुळे बंद करण्यात आले आहे. गांधी मैदानावर आयोजित ट्रेलर लॉन्चिंग कार्यक्रमात भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंगनेही परफॉर्म केले. त्यामुळे गांधी मैदानातही मोठी गर्दी झाली आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनाही संघर्ष करावा लागला.

दरम्यान, याआधी अल्लू अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्टर शेअर केले होते. ज्यामध्ये तो एका नव्या अवतारात दोन कुऱ्हाडी हातात घेऊन दिसत आहे. तसेच कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, ‘#Pushpa2TheRuleTrailer उद्या संध्याकाळी 6:03 वाजता प्रदर्शित होईल. रविवारी पाटण्यात पुष्पा-२ चा ट्रेलर लॉन्च करण्यात आला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;