सारा अली खानचं मोठं वक्तव्य, ‘तो एकटा मुलगा आहे ज्याला मी…’

सारा अली खानचं मोठं वक्तव्य, ‘तो एकटा मुलगा आहे ज्याला मी…’

Sara Ali Khan Love Life: अभिनेत्री सारा अली खान फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना सारा अली खान हिचं नाव अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत जोडण्यात आलं. पण सारा हिने एकदा तिच्या बॉयफ्रेंडबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ‘तो’ एकच मुलगा आहे ज्याला मी डेट केलं… असं सारा म्हणाली होती. आता तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की सारा नक्की कोणाबद्दल बोलली असेल.

रिपोर्टनुसार, सारा अली खान आता सिंगल आहे. पण एक काळ असा होता जेव्हा सारा वीर पहाडिया याला डेट करत होती. त्यानंतर सारा हिचं नाव अभिनेता कार्तिक आर्यन याच्यासोबत देखील जोडण्यात आलं. दरम्यान, 2019 मध्ये सारा हिने प्रेमाची कबुली दिली होती.

सारा हिने माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू वीर पहाडिया याला डेट केल्याची कबुली दिली होती. ‘फिल्मफेअर’ पुरस्कार सोहळ्यात सारा म्हणाली होती, ‘वीर एकटा मुलगा आहे ज्याला मी डेट केलं आहे. त्याच्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरा कोणताच बॉयफ्रेंड नव्हता…’ असं सारा म्हणाली होती.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

 

सांगायचं झालं तर, 2016 मध्ये जेव्हा सारा आणि वीर यांची काही फोटो व्हायरल झाल्यानंतर दोघांच्या नात्याच्या चर्चांना सर्वत्र जोर धरला होता. तेव्हा दोघे एकमेकांना डेट करत आहेत… असं चर्चा रंगली होती. एवढंच नाही तर, एका सिनेमाच्या स्क्रिनिंग दरम्यान साराच्या बोटातील अंगठीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. तेव्हा साराने वीर याच्यासोबत लग्न केल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला होता.

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन

बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये साराने कार्तिक बद्दल भावना व्यक्त केल्या होत्या ‘कार्तिकवर माझं क्रश आहे आणि मला तो आवडतो…’ असं सारा म्हणाली होती. त्यानंतर सारा – कार्तिक यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी देखील जोर धरला. सारा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;