Mysore News – दुर्देवी घटना, मैसूरमध्ये स्विमिंगपूलमध्ये तीन तरुणी बुडाल्या

Mysore News – दुर्देवी घटना,  मैसूरमध्ये स्विमिंगपूलमध्ये तीन तरुणी बुडाल्या

मैसूरमध्ये नुकतीच एक धक्कादायक घटना घडली आहे. आज 17 नोव्हेंबर रोजी सकाळी सोमेश्वर उचिला येथील खासगी बीच रिसॉर्टच्या स्विमिंग पूलमध्ये तीन तरुणींचा बुडून मृत्यू झाला. या तिघीही मैसूर येथील रहिवासी आहेत.

तरुणी 16 नोव्हेंबर रोजी रिसॉर्टला गेल्या होत्या आणि 2 नंबर रुममध्ये थांबल्या होत्या. रविवारी सकाळी साधारण 10च्या सुमारास त्या स्विमिंगपूलमध्ये खेळता खेळता त्यातली एक जण बुडायला लागली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसरी बुडाली आणि त्यानंतर तिसरीही बुडाली. हा संपूर्ण प्रकार हॉटेलच्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला .

मिळालेल्या माहितीनुसार, कुरुबरहल्ली फोर्थ क्रॉस येथील निशिता एम.डी. (21), रामानुजा रोडच्या के.आर. परिसरातील पार्वती एस. (20) आणि विजयनगर येथील देवराज परिसरातील कीर्तना एन. (21) अशी त्यांची नावे आहेत. या तरुणींनी पूलाशेजारी कपडे ठेवले होते आणि पाण्यात उतरण्यापूर्वी त्यांची रेकॉर्डींग करण्यासाठी त्यांनी आयफोनमध्ये कॅमेरा सेट केला होता. या तिघींनाही पोहता येत नव्हते.रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांना ही घटना कळली. तलावात धडपडणाऱ्या मुली सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्या आहेत. याप्रकरणी उल्लालचे पोलिस निरीक्षक एच.एन. बालकृष्ण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी भेट दिली. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;