Anupama Set Accident – ‘अनुपमा’च्या सेटवर अपघात, शॉक लागून कर्मचाऱ्याचा मृत्यू

Anupama Set Accident – ‘अनुपमा’च्या सेटवर अपघात, शॉक लागून कर्मचाऱ्याचा मृत्यू

स्टार प्लसवरील प्रसिद्ध मालिका अनुपमाच्या सेटवर मोठी दुर्घटना घडली आहे. ज्याने एका कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे.

विनीत कुमार मंजल (32) असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. 14 नोव्हेंबर रोजी शॉक लागून त्याचा मृत्यू झाला आहे. तो या शो मध्ये कॅमेरा अटेंडेंट म्हणून काम करत होता. दरम्यान तो काही तांत्रिक गोष्टी हाताळत असताना ही घटना घडली. यावेळी त्याचा चुकून विजेच्या तारेला स्पर्श झाला.त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे. मात्र त्यानंतर या शो चे निर्माते आणि टीमवर आरोप होऊ लागले आहेत. सेटवर सुरक्षेबाबात खबरदारी न घेतल्याने विनीतचा मृत्यू झाल्याचे समजते.

ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचे (एआयसीडब्ल्यूए) अध्यक्ष सुरेश गुप्ता यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना निर्माते आणि चॅनलने सेटवर सुरक्षेची खबरदारी घेतली नाही अशी टीका केली. ते म्हणाले, “गेल्या काही वर्षांपासून ‘अनुपमा’चे शूटिंग सुरू आहे. मात्र, 14 नोव्हेंबरला सेटवर एक घटना घडली, ज्यामध्ये आमचा एक कर्मचारी विनीत कुमार मंडल याला विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;