मुंबईकरांचा आवाज दाबायला निघालेल्या सरकारला घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही! आदित्य ठाकरे यांची गर्जना

मुंबईकरांचा आवाज दाबायला निघालेल्या सरकारला घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही! आदित्य ठाकरे यांची गर्जना

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख यांचा प्रचारासाठी झंझावात सुरू आहे. त्यांनी शनिवारी गोरेगाव विधानसभा मतदारसंघ आणि जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतली. यावेळी मुंबईकरांचा आवाज दाबायला निघालेल्या सरकारला घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही, अशी गर्जना त्यांनी केली.

याबाबत आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की,
विजय मशालीचा,
विजय महाराष्ट्राचा!

आज १६३ गोरेगाव विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार समीर देसाई जी आणि १५८ जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनंत (बाळा) नर यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या जाहीर सभेस उपस्थित राहिलो.

मुंबईकरांचा आवाज दाबायला निघालेल्या ह्या सरकारला घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही!

मुंबई अदानीच्या घशात घालण्यात येत आहे. मुंबईकरांचा आवाज दाबण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. राज्यातील उद्योग गुजरातमध्ये पळवले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि मुंबईकरांचा आवाज दाबायला निघालेल्या सरकारला घरी बसवा, असे आवाहन त्यांनी केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;