बॉबी देओलसोबत लग्न केलं असतं तर कधीच…, प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा

बॉबी देओलसोबत लग्न केलं असतं तर कधीच…, प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा

Bobby Deol Love Story: बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना अनेक सेलिब्रिटी त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत येतात. 90 च्या दशकातील अनेक सेलिब्रिटी आता त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहेत. पण एक काळ असा होता जेव्हा सेलिब्रिटी त्यांच्या प्रेम प्रकरणांमुळे चर्चेत होता. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे अभिनेता बॉबी देओल. बॉबी देओल आणि अभिनेत्री नीलम कोठारी यांनी एकमेकांना तब्बल 5 वर्ष डेट केलं. पण दोघांचं नातं लग्नपर्यंत पोहोचू शकलं नाही. अभिनेते धर्मेंद्र यांच्यामुळे बॉबी – नीलम यांनी स्वतःचे मार्ग वेगळे केले.. असं देखील अनेकदा समोर आलं.

रिपोर्टनुसार, एक अभिनेत्री देओल कुटुंबाची सून व्हावी अशी धर्मेंद्र यांची कधीच इच्छा नव्हती…. असं देखील सांगण्यात येतं. पण दोघांच्या ब्रेकअपसाठी अभिनेत्री पूजा भट्ट हिला देखील जबाबदार ठरवण्यात आलं. बॉबी देओल आणि पूजा भट्ट यांच्यातील नात्यामुळे नीलमसोबत अभिनेत्याचं ब्रेकअप झालं… असं देखील अनेकदा सांगण्यात आलं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Neelam (@neelamkotharisoni)

 

पण ब्रेकअपसाठी नीलम हिने कोणालाच जबाबदार ठरवलं नाही. एका मुलाखतीत नीलम हिने बॉबीसोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं होतं. ‘मी आणि बॉबी, पूजा भट्ट हिच्यामुळे विभक्त झालो नाही. मला अचानक वाटू लागलं की, बॉबीसोबत लग्न झाल्यानंतर मी आयुष्यात कधीच आनंदी राहू शकली नसती. हे समजण्यासाठी मला 5 वर्ष लागली…’

‘मला एका स्टारची पत्नी म्हणून स्वतःचं करियर संपवायचं नव्हतं. बॉबी सोबत राहिल्यानंतर काय होईल याची सतत भीती वाटायची. नंतर काही वाईट होईल याचा विचार देखील मी करू शकत नव्हती. बॉबी देओल याच्या करिअर बद्दल देखील मला खात्री नव्हती.’ असं देखील नीलम म्हणाली होती.
आता बॉबी देओल आणि नीलम देखील त्यांच्या खासगी आयुष्यात आनंदी आहेत. बॉबी देओल याने इंटिरियर डिझायनर तान्या हिच्यासोबत लग्न केलं. तर नीलम कोठारी हिने पहिल्या घटस्फोटनंतर अभिनेता समीर सोनी याच्यासोबत लग्न केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;