‘बिग बॉस 18’ मध्ये होणार तिसरी वाईल्ड कार्ड एन्ट्री, नवीन सदस्याचे नाव आले समोर

‘बिग बॉस 18’ मध्ये होणार तिसरी वाईल्ड कार्ड एन्ट्री, नवीन सदस्याचे नाव आले समोर

सलमान खानच्या होस्टमुळे ‘बिग बॉस 18’ चा वीकेंड का वार एपिसोड प्रेक्षकांना खूप आवडला. शोमध्ये परतताच सलमानने घरात उपस्थित असलेल्या काही स्पर्धकांचा क्लास घेतला. शिवाय अशनीर ग्रोव्हर देखील शोचा एक भाग बनला, त्यामुळे हा भाग खूपच मजेशीर झाला. आता या शो संबंधित आणखी एक बातमी समोर आली आहे. दिग्विजय राठी आणि कशिश कपूर यांच्यानंतर आता बिग बॉस 18 मध्ये तिसरी वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे.

बिग बॉस 18 मध्ये तिसरी वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणाऱ्या नवीन सदस्याचे नाव देखील समोर आले आहे. घरात एन्ट्री घेणारी सदस्य एक मॉडेल आणि अभिनेत्री असून तिने साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे. एडिन रोज असे तिसरी वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणाऱ्या सदस्याचे नाव आहे.

एडिन रोज एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. एडिनचा जन्म दुबईत झाला असून चार वर्षांपूर्वी अॅक्टिंगमध्ये आपले नशीब आजमावण्यासाठी ती भारतात आली. एडिनने रवी तेजासोबत त्याच्या चित्रपटात एक आयटम साँग केले होते. सध्या ती विघ्नेश शिवन, कीर्ति सुरेश यांच्यासोबत एका प्रोजेक्टवर काम करत आहे.

एंटरटेनमेंट टाईम्सशी बोलताना एका प्रॉडक्शनच्या सूत्राने सांगितले की, बिग बॉसच्या घरातील उत्साह कायम ठेवण्याच्या उद्देशाने आम्ही नवीन घटक नियमित अंतराने जोडत आहोत. एडिन रोजला आणून आम्हाला केवळ खेळाला मनोरंजक करायचे नाही तर शोमध्ये ग्लॅमर देखील वाढवणे ही आमची स्ट्रॅटेजी आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;