आधी टिकली लाव मग मी बोलेन..; संभाजी भिंडेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचं वेगळं मत चर्चेत

आधी टिकली लाव मग मी बोलेन..; संभाजी भिंडेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचं वेगळं मत चर्चेत

शिवप्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे मागच्या वर्षी मंत्रालयात आले होते. तेव्हा त्यांना एका महिला पत्रकाराने तुम्ही कुणाची भेट घेण्यासाठी आला आहात? असा प्रश्न विचारला. तेव्हा संभाजी भिडे यांनी त्या महिला पत्रकाराला टिकलीवरून सुनावलं. प्रत्येक स्त्री भारतमाता आहे. आमची भारतमाता विधवा नाही, त्यामुळे तू आधी कुंकू, टिकली लाव मग मी तुझ्याशी बोलेन, असं संभाजी भिडे म्हणाले होते. वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणाऱ्या संभाजी भिडेंच्या या वक्तव्यानेही वाद निर्माण झाला होता. संभाजी भिडेंच्या त्या विधानावर मराठी अभिनेत्रीने भाष्य केलं आहे.

संभाजी भिडेंसोबतच्या भेटीची आठवण

अभिनेत्री राधिका देशपांडे हिने संभाजी भिडे यांच्या त्या विधानावर एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे. सांगलीतील मिरजला ‘नथुराम गोडसे’ नाटकाचा प्रयोग होता. तिथे भिडे काकांची भेट झाली. सहाजिकच मला फोटो काढावासा वाटला. मी फोटो काढला आणि तो ठेवला होता.मी काय मी लगेच पोस्ट केला नव्हता. त्याच दरम्यान टिकलीवर काहीतरी घाव घालण्यात आला. भिडेकाकांवर बोललं गेलं की, त्यांनी सांगितलं पत्रकाराला, एक बाई होती. त्यांना सांगितलं की तू टिकली लावून ये मग मी बोलेन. आता ते कुठल्या याच्यावर बोलले ते मला काहीच माहिती नाही, असं राधिका म्हणाली.

राधिका देशपांडेचं विधान चर्चेत

टिकली लावायची की नाही लावायची, कधी लावायची का नाहीच लावायची या विषयावर प्रत्येक स्त्रीला स्वातंत्र्य असायला हवं. कुंकवाला पर्याय म्हणून आपण टिकली लावतो. तर मला खूप विचार करावासा वाटला. भिडे काका असं बोलले, का बोलले असतील? मग खरंच ते बरोबर आहे का? मग खरंच आपण आपली संस्कृती सोडतो आहोत का? टिकली लावली नाही तर… प्रत्येक ठिकाणी जाण्याचा मला असं वाटतं सभ्यता आणि शिष्टाचार असतो. मला असं वाटतं की टिकली लावायला पाहिजे. न लावून फार असे काय तुम्ही ग्रेट आहात, असं दाखवत असाल तर ते तसं नाहीये. टिकली लावणाऱ्या बायका पण अतिशय सुंदर दिसतात, असं मत राधिकाने मांडलं आहे. तिचं हे विधान सध्या चर्चेत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;