शिर्डीत साईभक्तांना हार, फुले वाजवी दरात मिळणार

शिर्डीत साईभक्तांना हार, फुले वाजवी दरात मिळणार

शिर्डीत आता साईभक्तांना वाजवी दरात हार, फुले मिळतील. गेल्या वर्षी तसा ठराव करण्यात आला होता. या ठरावाची अंमलबजावणी करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे अनधिकृत हार, फुले विव्रेत्यांकडून साईभक्तांची लूट होणार नाही याची काळजी स्थानिक प्रशासन व पोलीस घेणार आहेत. या ठरावाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करणारा अर्ज दाखल करण्यात आला होता. न्या. मंगेश पाटील व न्या. शैलेश ब्रम्हे यांच्या खंडपीठासमोर या अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयाने हा अर्ज मंजूर केला. साईभक्तांकडून अर्पण केल्या जाणाऱया हार, फुलांची विल्हेवाट कशी लावली जाणार याबाबतही लवकरात लवकर कार्यवाही करावी, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने समितीला दिले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;