महायुतीचे उमेदवार विलास भुमरे भोवळ आल्याने गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर

महायुतीचे उमेदवार विलास भुमरे भोवळ आल्याने गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर

सध्या राज्यभरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सर्वच उमेदवारांनी कंबर कसून प्रचाराचा धडाका लावला आहे. दररोज राज्याच्या कानाकोपऱ्यात विविध सभा पार पडत आहेत. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. छत्रपती संभीजनगरमघील पैठण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार विलास भुमरे भोवळ आल्याने गॅलरीतून पडले आणि त्यामुळे त्यांचे हात-पाय फ्रॅक्चर झाल्याची घटन घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विलास भुमरे यांना पाचोडा येथील निवासस्थानी पहाटे भोवळ आली आणि ते गॅरलीमधून खाली पडले. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली असून डावा हात आणि डावा पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्यांना तत्काळ छत्रपती संभाजीनगरमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;