युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे रविवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर; वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे रविवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर; वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे रविवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ रविवारी सायंकाळी 6 वाजता कुडाळ तालुक्यातील माणगाव बाजारपेठ येथे त्यांची जाहीर प्रचार सभा होणार आहे. या सभेसाठी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केले आहे.

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचारासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नुकतीच मालवण येथे जाहीर प्रचार सभा झाली. त्यानंतर उपनेत्या सुषमा अंधारे यांचीही प्रचार सभा कुडाळ येथे झाली. त्यापाठोपाठ शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असून ते जाहीर प्रचार सभा घेणार आहेत. या सभेचे नियोजन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;