लातूरमध्ये गावठी कट्टा बाळगणारा तरुण ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लातूरमध्ये गावठी कट्टा बाळगणारा तरुण ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात रेणापूर ते समसापूर गावाकडे जाणाऱ्या रोड वरून एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून एक गावठी कट्टा (पिस्टल) जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर कृष्णा बालाजी कदम (वय 23, रा.लक्ष्मी नगर, रेणापूर) याला ताब्यात घेत त्याच्याकडून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला.

याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे रेणापूर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 397/2024 कलम 3 (1) 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद झालेला असून पुढील तपास रेणापूर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जाधव हे करीत आहेत. ही कारवाई परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक राजश्री तेरणी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथका मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड, पोलीस अंमलदार माधव बिलपटे , नवनाथ हासबे, तुराब पठाण, राजेश कचे, प्रदीप स्वामी, राजू मस्के, नकुल पाटील यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;