प्रोडक्शन हाऊसवर कर्जाचा डोंगर, कित्येक कलाकारंचे पैसे थकवल्याचा आरोप; ‘या’ चित्रपटाला हो म्हणणं शाहिद कपूरला महागात

प्रोडक्शन हाऊसवर कर्जाचा डोंगर, कित्येक कलाकारंचे पैसे थकवल्याचा आरोप; ‘या’ चित्रपटाला हो म्हणणं शाहिद कपूरला महागात

अभिनेता शाहिद कपूरच्या चित्रपटावरील ग्रहण काही हटताना दिसत नाहीये. प्रोडक्शन हाऊसवर कर्जाचा डोंगर असल्याने शाहिदचा ‘बिग बजेट’
चित्रपटाचे शुटींगच थांबले आहे. शाहिदच्या 500 कोटींच्या चित्रपटाला मोठा ब्रेक लागला आहे. शाहिदचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘अश्वत्थामा: द सागा कंटीन्यूज’ला सध्या थांबवण्यात आलं आहे. त्यामुळे चित्रपट नेमका कधी रीलिज होणार आता मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

चित्रपटाचे बजेट 500 कोटींहून जास्त

चित्रपटाचे बजेट 500 कोटींहून जास्त झाले होते. त्यानंतर आता निर्मात्यांनी चित्रपटाचे काम थांबवल्याचे समजते. हा चित्रपट महान योद्धा अश्वत्थामा यांची महाकथा पडद्यावर आणणार होता, पण आता तो थांबवण्यात आला आहे.

Shahid Kapoor's ₹500 Crore Film 'Aashwatthama' Halted

‘अश्वत्थामा: द सागा कंटिन्यूज’ या पौराणिक ॲक्शनपटाची घोषणा यावर्षी मार्चमध्ये करण्यात आली. या चित्रपटात शाहिद कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कन्नड चित्रपट दिग्दर्शक सचिन बी. रवी करत आहेत.रिपोर्टनुसार चित्रपटाचे बजेट 500 कोटींच्या वर पोहोचले असल्याने हा प्रोजेक्ट मध्येच थांबवण्यात आला.

बजेटमुळे सिनेमा थांबला

‘अश्वत्थामा: द सागा कंटिन्यूज’ हा चित्रपट ॲमेझॉन स्टुडिओसह निर्माता वासू भगनानी यांच्या पूजा एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनवला जात होता. पण बजेटची कमतरता आणि लॉजिस्टिक आव्हानांमुळे चित्रपट थांबवण्यात आला.

Shahid Kapoor's ₹500 Crore Film 'Aashwatthama' Halted

रिपोर्टनुसार हा चित्रपट आंतरराष्ट्रीय कल्पनारम्य-ॲक्शन चित्रपटांशी स्पर्धा करू शकेल असे काहीतरी बनवण्याची कल्पना होती. अश्वत्थाम्याचे चित्रीकरण अनेक देशांत होणार होते. पण आंतरराष्ट्रीय स्थळांवर शूटिंग बजेटमध्ये करणे अशक्य झाले. हा चित्रपट थांबण्यामध्ये पूजा एंटरटेनमेंटचे कर्ज हा आणखी एक मोठा घटक ठरला.

प्रोडक्शन हाऊस आधीच वादाच्या भोवऱ्यात

वासू भगनानी आणि त्यांचे प्रोडक्शन हाऊस पूजा एंटरटेनमेंट आधीपासूनच वादात आहेत. अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम केलेल्या कलाकारांची थकीत फी परत न केल्याचा आरोप निर्माता आणि त्याच्या प्रोडक्शन हाऊसवर आहे. त्यात आता या चित्रपटाचीही भर पडली आहे. त्यामुळे आता हा चित्रपट नक्की पूर्ण होणार का हाच मोठा प्रश्न सर्वांसमोर आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;