देवेंद्र फडणवीसांनी अकलेचे तारे तोडत भाजपचा खरा चेहरा दाखवला, रोहीत पवार यांची टीका

देवेंद्र फडणवीसांनी अकलेचे तारे तोडत भाजपचा खरा चेहरा दाखवला, रोहीत पवार यांची टीका

भाजप नेते, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी कर्जत – जामखेड मतदारसंघात सभा पार पडली. या सभेत विरोधकांवर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत खालच्या दर्जाचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा महाविकास आघाडीचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे उमेदवार रोहित पवार यांनी समाचार घेतला. देवेंद्र फडणवीसांनी अकलेचे तारे तोडत भाजपचा खरा चेहरा दाखवल्याचा सणसणीत टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

महायुतीचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर भाषण पार पडले. यावेळी बोलत असताना देवेंद्र फडणवीसांनी, “काही झालं की आम्हीच केलं, ते घडलं तर माझ्यामुळे घडलं, त्याच्याकडे पोरगा झाला तर माझ्यामुळे झाला.” अशा पद्धतीचे वक्तव्य केले होते.

रोहित पवार यांनी एक्स अकाउंटवर ट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा समचार घेतला. ते म्हणाले की, काल माझ्या मतदारसंघात दोन-तीन विकृत लोकांनी अकलेचे तारे तोडत महिलांविषयी अत्यंत खालच्या पातळीची वक्तव्ये केली आणि आज तसेच अकलेचे तारे तोडत देवेंद्र फडणवीस साहेबांनीही भाजपचा खरा चेहरा दाखवला. फडणवीस साहेब आपल्याकडून ही अपेक्षा नव्हती. पण आता महाराष्ट्र अशा प्रवृत्तींना ठेचल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;