“आम्हा दोघांना लग्नाबाहेर अफेअर करायचं होतं म्हणून..”; कबीर बेदी यांचा पत्नीबाबत खुलासा

“आम्हा दोघांना लग्नाबाहेर अफेअर करायचं होतं म्हणून..”; कबीर बेदी यांचा पत्नीबाबत खुलासा

अभिनेते कबीर बेदी यांनी चार वेळा लग्न केलं. ओडिशी डान्सर प्रोतिमा बेदी यांच्याशी त्यांनी पहिलं लग्न केलं होतं. कबीर आणि प्रोतिमा यांना पूजा आणि सिद्धार्थ ही दोन मुलं आहेत. पण या वैवाहिक आयुष्यात त्यांनी बऱ्याच चढउतारांचा सामना केला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कबीर यांनी खुलासा केला की त्यांनी आणि प्रोतिमाने ‘ओपन मॅरेज’मध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. “आम्हाला मुलांसाठी एकत्रही राहायचं होतं आणि बाहेर अफेअरही करायचं होतं.. म्हणून आम्ही ओपन मॅरेजचा निर्णय घेतला”, असं ते म्हणाले. असं असूनही या दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. ‘डिजिटल कॉमेंट्री’ला दिलेल्या मुलाखतीत कबीर यांना त्यांच्या पहिल्या पत्नीसोबतच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते मोकळेपणे व्यक्त झाले.

“जेव्हा तुम्ही भूतकाळाचा विचार करता, तेव्हा तुम्हाला काही पश्चात्ताप होतात. प्रत्येकाला हे वाटतं आणि काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने हाताळल्या जाऊ शकल्या असत्या असं तुम्हाला वाटतं. एक वेळ अशी होती, जेव्हा आम्हाला फक्त मुलांसाठी एकत्र राहायचं होतं. तिलाही बाहेर अफेअर करायचं होतं आणि मलाही दुसरं अफेअर हवं होतं, त्यामुळे सर्वोत्तम उपाय हा ओपन मॅरेजचा असेल, असं आम्हाला वाटलं होतं. तुला जे वाटतं ते तू कर आणि मला जे वाटतं ते मी करेन. आपण एकत्र राहून फक्त मुलांचं संगोपन करुयात, त्यांचे पालक म्हणून सोबत राहुयात. पण दुर्दैवाने त्या निर्णयानेही फारसा फरक पडला नाही”, असं कबीर बेदी म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kabir Bedi (@ikabirbedi)

पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतरही मुलांना पुरेसा वेळ दिल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावेळी ते अमेरिकेत राहत होते आणि तिथेच काम करत होते. तेव्हा उन्हाळी आणि हिवाळ्याच्या सुट्टीत त्यांना भेटायला त्यांची मुलं अमेरिकेत जायची. “आम्ही विभक्त झालो तरी, आमचा घटस्फोट झाला तरी मी माझ्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. मी माझं घर तिला दिलं आणि तिची आर्थिक मदत केली. आम्हाला दोन मुलं आहेत, म्हणून आम्ही आयुष्यभर मित्रमैत्रिणींसारखे राहिले. आम्ही आमच्या मुलांना हे पटवून दिलं की जरी त्यांचे पालक एकत्र राहू शकत नसले तरी ते पालक म्हणून एकत्र आहेत”, अशा शब्दांत ते व्यक्त झाले.

ओपन मॅरेज ही एक अशी संकल्पना आहे, ज्यामध्ये पती आणि पत्नी दोघं एकाच घरात सोबत राहत असले तरी ते बाहेर इतर व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये राहू शकतात किंवा अफेअर करू शकतात. दोघंही त्यांच्या वैयक्तिक अफेअर्सबद्दल एकमेकांना बांधिल नसतात. पण समाजासाठी ते पती आणि पत्नी म्हणून सोबत राहतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;