अयोध्या-लखनऊ महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात, तीन ठार तर 15 जण जखमी

अयोध्या-लखनऊ महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात, तीन ठार तर 15 जण जखमी

उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. अयोध्या-लखनऊ महामार्गावर भरधाव ट्रकने ट्रॅव्हलरला जोरदार धडक दिली. यानंतर अजून एक कार त्यांना धडकली. यात कारमधील तिघांचा मृत्यू झाला तर अन्य 15 जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय पथकाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातग्रस्त वाहनांना रस्त्यावरून हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. दोघांना रुदौली सीएचसी येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही जखमींवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले तर काहींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;