शारदाश्रमने उडवला स्वामी विवेकानंदचा धुव्वा

शारदाश्रमने उडवला स्वामी विवेकानंदचा धुव्वा

आर्यन सकपाळच्या  101 चेंडूंतील 170 धावांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर शारदाश्रम विद्यामंदिरने कांदिवलीच्या स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय शाळेचा 318 धावांनी धुव्वा उडवत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. तसेच सर सी.जे. हायस्कूल, जमनाबाई नरसी, नॅशनल इंग्लिश स्कूल या संघांनीही 128 व्या हॅरिस शिल्ड आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

आज मुंबईच्या विविध मैदानांवर झालेल्या सामन्यात एकेकाळी मुंबईचे शालेय क्रिकेट गाजवणाऱ्या शारदाश्रमने आर्यन सकपाळच्या 170, खूश पाटीलच्या 34 चेंडूंतील 74 आणि रुद्र कुलावडेच्या 55 धावांमुळे 7 बाद 470 अशी मोठी धावसंख्या उभारली. पण शारदाश्रमचे हे आव्हान स्वामी विवेकानंदला झेपलेच नाही. शुभम वरपे आणि स्वराज शेवाळे यांनी स्वामी विवेकानंदचा डाव 142 धावांतच गुंडाळला आणि शारदाश्रमने 318 धावांचा महाविजय मिळवला. तसेच जमनाबाई नरसी हायस्कूलने आर्य गुरुकुलचा 374 धावांनी पराभव केला. निल डागाच्या 169 धावांच्या जोरावर नरसीने 4 बाद 425 धावा केल्या होत्या, तर आर्य गुरुकुलचा डाव अवघ्या 51 धावांतच आटोपला. सर सी.जे. हायस्कूलने खेतान शाळेचा 9 विकेटनी धुव्वा उडवला. तर नॅशनल इंग्लिश हायस्कूलने 498 धावा केल्या तर ज्ञान पेंद्र शाळेचा अवघ्या 61 धावांत फडशा पाडला गेला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;