वादग्रस्त रश्मी शुक्ला यांना पुन्हा शासकीय सेवेत घेऊ नका, काँग्रेसची हायकोर्टात याचिका

वादग्रस्त रश्मी शुक्ला यांना पुन्हा शासकीय सेवेत घेऊ नका, काँग्रेसची हायकोर्टात याचिका

पोलीस महासंचालक पदावरून रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे; पण निवृत्त झालेल्या रश्मी शुक्ला यांना पुन्हा सेवेत घेतले जाऊ नये. त्यांना कोणत्याही सरकारी पदावर नियुक्त करण्यात येऊ नये या मागणीसाठी काँग्रेसने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून दूर करावे अशी मागणी काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली होती. शिवसेनेनेही ही मागणी केली होती. विरोधकांच्या आक्षेपानंतर पोलीस महासंचालक  रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. त्यांच्या जागी सरकारने संजय कुमार यांची नियुक्ती केली; पण ही नियुक्ती करताना ती केवळ निवडणूक कालावधीपुरती मर्यादित ठेवण्यात आली आहे. या तात्पुरत्या नियुक्तीच्या विरोधातही काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली; पण निवडणूक आयोगाने दखल न घेतल्याने अखेर काँग्रेसने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. रश्मी शुक्ला यांना पदावरून काढून टाकावे असे निवडणूक आयोगाच्या आदेशात म्हटले असताना त्यांना सक्तीच्या रजेवर का पाठवले, असा सवाल या याचिकेत केला आहे.  त्या पदावरून निवृत्त होणे आवश्यक होते. पण निवृत्तीऐवजी सरकारने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. त्यांना पुन्हा सेवेत घेतले जाऊ नये, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी याचिकेत केली आहे.

z रश्मी शुक्ला यांना ज्या क्षणी पदावरून काढले त्याच क्षणी त्या निवृत्त झालेल्या आहेत. आता त्यांच्या जागी संजयकुमार वर्मा यांची कायम स्वरूपाची नियुक्ती करून निवडणूक आयोगाच्या आदेशाचे पालन करावे. कारण वर्मा यांची तात्पुरती नियुक्ती करून निवडणूक आयोगाच्या संविधानिक अधिकारांची पायमल्ली झाली आहे.

z  पोलीस महासंचालकांच्या तात्पुरत्या नियुक्तीमुळे महासंचालकांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होईल. राज्य सरकारच्या या कृतीमुळे घटनात्मक संतुलनाला बाधा पोहचून कायदेशीर अनिश्चितता उद्भवू शकते. त्यामुळे सरकारची ही कार्यवाही नियमबाह्य असल्याचे याचिकेत नमूद केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;