मावस भावाचा मूकबधिर मुलीवर लैंगिक अत्याचार

मावस भावाचा मूकबधिर मुलीवर लैंगिक अत्याचार

16 वर्षांच्या मूकबधीर अल्पवयीन मुलीवर 22 वर्षीय मावस भावाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी विरोधात पोलिसांनी लैंगिक अत्याचारासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्या (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

16 वर्षांची मुलगी तिच्या कुटुंबीयांसोबत राहत असून ती मूकबधीर आहे. आरोपीदेखील त्याच परिसरात वास्तव्यास होता. 1 मे ते 30 ऑक्टोबर 2024 या कालावधीत तो मावशीच्या घरी वास्तव्यास होता. मावशीची मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केला. दोन दिवसांपूर्वी मुलीच्या आईला हा प्रकार समजला. त्यामुळे त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी मावस भावाविरुद्ध लैंगिक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी मुंबई बाहेर पळून गेल्याने मुंबई पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;