मालमत्ता कर ‘ऑनलाइन’ भरण्याची प्रक्रिया सुरळीत

मालमत्ता कर ‘ऑनलाइन’ भरण्याची प्रक्रिया सुरळीत

मुंबई पालिकेच्या कर निर्धारण व संकलन खात्याच्या सर्व्हरमध्ये येत असणाऱ्या अडचणी दूर झाल्या असून मालमत्ता कर भरण्याची प्रक्रिया सुरळीत झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. नागरिकांनी मालमत्ता कर भरणा करण्यासाठी प्रथम स्वतःच्या मोबाईलवर उपलब्ध असलेल्या Gpay – UPI सुविधेचा वापर करावा, असे आवाहन पालिकेने केले. पालिकेने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी मालमत्ताकराची सुमारे सवा सहा लाख देयके निर्गमित केली आहेत. पालिकेच्या https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर मालमत्ताकर देयके नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. कर निर्धारण व संकलन खात्याने मालमत्ता करप्रणालीचे सर्व्हर्स नवीन क्लाऊडवर स्थलांतरीत केले आहेत. तथापि, मालमत्ताकर ऑनलाइन भरण्याच्या प्रक्रियेत वन टाइम पासवर्ड (ओटीपी) मिळणेकामी किरकोळ अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब विचारात घेऊन करनिर्धारण व संकलन खात्याकडून प्रणालीस्तरावरील त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत मालमत्ता कर ‘ऑनलाइन’ भरण्याची प्रक्रिया सुरळीत करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;