चेंबूरमध्ये म्हाडा कॉलनीत आग

चेंबूरमध्ये म्हाडा कॉलनीत आग

चेंबूरच्या भारत नगर भागातील ‘म्हाडा’ कॉलनीमधील सात मजली इमारतीच्या तळमजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली. एका घरात लागलेल्या या आगीवर अग्निशमन दलाने त्वरीत नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली असली तरी या दुर्घटनेत एक 60 वर्षीय व्यक्ती जखमी झाली आहे. जखमीवर पालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चेंबूर, वाशीनाका येथील म्हाडा कॉलनीमधील इमारत क्रमांक 6मधील तळमजल्यावरील एका घरात बुधवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास आग लागली. घरातील सिलिंडरचा मुख्य व्हॉल्व्ह आणि रेग्युलेटरमधून गॅस लिकेज झाल्याने ही आग लागल्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य हाती घेतले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;