सई लळीत यांच्या मालवणी कवितांवर नाट्याविष्कार

सई लळीत यांच्या मालवणी कवितांवर नाट्याविष्कार

कवयित्री डॉ. सई लळीत यांच्या मालवणी कवितांवर आधारित नाटय़ाविष्कार ‘भावबंध कोकणचे’ हा कार्यक्रम गोवा येथे होणार आहे. मालवणी कवितांचे अभिवाचन, रसाळ निवेदन आणि कवितांवरील नाटय़ाविष्कार असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. घुंगुरकाठी सिंधुदुर्ग निर्मित या कार्यक्रमात कविता, संहिता, सादरीकरण, दिग्दर्शन डॉ. सई लळीत यांचे आहे.

‘भावबंध कोकणचे’मध्ये नीलेश पवार, सुप्रिया प्रभुमिराशी, मंगल राणे, डॉ. संदीप नाटेकर, राकेश काणेकर, श्रेयस शिंदे, सत्यवान गावकर, सिद्धी वरवडेकर, विशाल गुरव, प्रमोद कोयंडे, तृप्ती भोगले, श्रद्धा परब, नारायण आईर सहभागी होतील. हा कार्यक्रम 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा, पोलीस मुख्यालयाजवळ, पणजी येथे होईल. संपर्क- 9422413800/9422414800.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;