धक्कादायक! ट्रम्प यांच्या विजयानंतर महिलेने कुऱ्हाडीने वार करत वडिलांचीच केली हत्या

धक्कादायक! ट्रम्प यांच्या विजयानंतर महिलेने कुऱ्हाडीने वार करत वडिलांचीच केली हत्या

अमेरिकेत एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा एकीकडे विजयाचा जल्लोष सुरु असतानाच दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे अस्वस्थ झालेल्या एका माथेफीरू तरुणीने जन्मदात्या बापाची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली आहे. आरोपी तरुणीने वडीलांच्या हत्येची कबुलीही दिली आहे.

‘न्यूयॉर्क पोस्ट’ या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, 33 वर्षीय कोरी बर्क ही तरुणी प्रसिद्ध उद्योजक जेफ बेझोस यांच्या स्पेस एक्सप्लोरेशन कंपनी ब्लू ओरिजमध्ये प्रोग्राम मॅनेजर या पदावर काम करत होती. यातच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले. यामुळे कोरी बर्क अस्वस्थ झाली होती. तिच्या मनात प्रचंड चीड होती. याच दरम्यान तिने 67 वर्षीय वडीलांना लाईट बंद करण्यास सांगितले. मात्र, वडीलांनी लाईट बंद करण्यास नकार दिला. त्यामुळे तिला राग अनावर झाला. यानंतर तिने वडीलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच गळा दाबला आणि कुऱ्हाडीने वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर बराच वेळ ती मृतदेहा शेजारी बसून होती.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा कोरीचा पूर्ण चेहरा रक्ताने माखलेला होता. पोलीस येताच तिने स्वत:ला पोलिसांच्या हवाली केलं. त्यानंतर तीन वडिलांच्या हत्येची कबुली दिली. पोलिसांनी तिला अटक केले असून तिच्यावर फर्स्ट-डिग्री हत्येचा आरोप लावण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;