Pune News – पुण्यातील स्वारगेट भागात 16 लाखांचा गुटखा पकडला, गुन्हा दाखल

Pune News – पुण्यातील स्वारगेट भागात 16 लाखांचा गुटखा पकडला, गुन्हा दाखल

पुणे शहरात छुप्या पद्धतीने गुटख्याची अवैध वाहतूक, विक्री सुरू असल्याचे वारंवार समोर आले असून बुधवारी दुपारी स्वारगेट परिसरातील पुरम चौकात गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडला. टेम्पोमध्ये सुगंधित तंबाखू, रजनीगंधा, विमल असा तब्बल 15 लाख 65 हजारांचा साठा आढळून आला. वाहतूक पोलिसांनी टेम्पो अडविल्यानंतर त्याची तपासणी केली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकाला अटक केली आहे.

कुदबुद्दीन अलीहुसेन दारूवाला (38, रा. मिठानगर, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत खडक वाहतूक विभागातील पोलीस कर्मचार्‍याने फिर्याद दिली आहे. बुधवारी दुपारी पुरम चौकात ही कारवाई करण्यात आली.

राज्यामध्ये गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू व इतर पदार्थाच्या विक्री व वापरास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. असे असले तरी पुण्यात गुटखाबंदी ही कागदावरच असल्याचे स्पष्ट होत आहे. मागील अनेक कारवायांमधून हे अधोरेखित झाले आहे. शहरातील छोट्या मोठ्या टपर्‍यांवर सहजरीत्या गुटखा उपलब्ध होतो. दरम्यान, बुधवारी दुपारी खडक वाहतूक विभागातील कर्मचारी पुरम चौकात थांबलेले होते. त्यावेळी तेथून जाणार्‍या एका टेम्पोला त्यांनी अडविले. संशय आल्याने त्यांनी टेम्पोची तपासणी केली तेव्हा आतमध्ये गुटख्याचा साठा आढळून आला. त्यानूसार स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेला व्यक्ती चालक म्हणून काम करतो. त्याने हा गुटखा कुणाच्या सांगण्यावरून तसेच कोठे घेवून जात होता, याबाबत स्वारगेट पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, स्वारगेट परिसरात यापुर्वी देखील गुटखा कारवाया करण्यात आलेल्या आहेत. याठिकाणी स्वारगेट पोलीस ठाणे, गुन्हे शाखा यूनिट दोनचे कार्यालय आहे. या पथकातील कर्मचार्‍यांची हद्दीत गस्त असते. तरीदेखील गुटखा विक्री सुरूच असल्याचे समोर येत आहे.

…नूकताच एक कोटींचा साठा जप्त केला

काही दिवसांपुर्वीच पुणे ग्रामिण पोलिसांनी खेड शिवापूर टोलनाका परिसरात तब्बल 1 कोटी 15 लाख 88 हजारांचा गुटखा जप्त केला. एका टेम्पोतून हा गुटखा कर्नाटक येथून पुण्यामध्ये येत होता. त्यानंतर आता स्वारगेट भागात ही कारवाई करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;