“किरण माने चुकला, राजकारण्यांपर्यंत घेऊन जाण्याइतकं..”; सविता मालपेकर स्पष्टच बोलल्या

“किरण माने चुकला, राजकारण्यांपर्यंत घेऊन जाण्याइतकं..”; सविता मालपेकर स्पष्टच बोलल्या

अभिनेते किरण माने यांना 2022 मध्ये स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढून टाकण्यात आलं होतं. राजकीय भूमिका घेतल्यामुळे त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याची सुरुवातीला चर्चा होती. नंतर निर्मात्यांकडून त्यांची बाजू मांडण्यात आली. या वादावर आता अभिनेत्री सविता मालपेकर यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. “किरण चांगला आहे, पण चांगली मागणं कधी कधी अशी का वागतात, हे मला कळत नाही. चुका सगळ्यांकडून होतात. पण त्या मान्य करण्याची आणि माफी मागण्याची तयारी असली पाहिजे”, असं त्या म्हणाल्या.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सविता मालपेकर म्हणाल्या, “सेटवरील वादविवाद हे सेटच्या बाहेर जाता कामा नये. गैरसमज झाले तर त्या व्यक्तीला विचारावं. बोलल्याने बऱ्याच गोष्टी ठीक होतात. सर्वांना एकत्र काम करायचं असताना हेवेदावे किंवा तोंड वाकडं करून चालत नाही. दुसरी गोष्टी म्हणजे एका व्यक्तीमुळे सेटवरील 100 लोक उपाशी मरता कामा नये. किरणला ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून न सांगता काढलेलं नव्हतं. त्याला वाहिनीने चार वेळा इशारा दिला होता. नेमकं कोणत्या कारण्यासाठी त्याला काढलं हे मलाही नीट माहीत नाही. त्यावेळी माझं दुसरं शूटिंग सुरू होतं. मालिकेच्या शूटिंगदरम्यान एका मिटींगमध्ये किरणने माफीसुद्धा मागितली होती. तरी नंतर त्याला का काढलं, हे मला माहीत नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

“किरण चुकला होता असं मला वाटतं. राजकारण्यांपर्यंत हे प्रकरण घेऊन जाण्याइतकं काही झालेलंच नव्हतं. किरणचं हे स्वत:चं डोकं नव्हतं. त्याच्या मागे एक शक्ती होती आणि त्यामुळे तो हे सर्व करत होता, असं माझं ठाम मत आहे. आपण चुकत असताना कुठे थांबलं पाहिजे हे माणसाला कळलं पाहिजे. इतरांचंही चुकलंच असेल. पण किरणने कुठेतरी थांबलं पाहिजे होतं, असं मला वाटत होतं. एकदा तो दिग्दर्शकाच्या अंगावर धावून गेला होता. सेटवर हे असं वागणं चुकीचं होतं”, असं मालपेकर यांनी सांगितलं.

किरण माने हे सोशल मीडियावर विविध मुद्द्यांवरून सतत पोस्ट लिहित असतात. अशाच एका पोस्टमुळे त्यांना मुलगी झाली हो या मालिकेतून बाजूला केल्याचं म्हटलं गेलं होतं. मात्र त्यांना राजकीय भूमिकेमुळे नाही तर इतर कारणांमुळे मालिकेतून काढण्यात आलं आणि त्याची त्यांना कल्पनाही होती, असा दावा निर्मात्या सुझाना घई यांनी केला होता. किरण माने यांना अनेकदा सूचना केल्या होत्या. पण तरीही समाधान न झाल्याने त्यांना काढण्याचा निर्णय घ्यावा लागला, असं निर्माते म्हणाले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;