“आयुष्याच्या चाकोरीत अडकलोय..”; ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेकचं वक्तव्य चर्चेत

“आयुष्याच्या चाकोरीत अडकलोय..”; ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेकचं वक्तव्य चर्चेत

अभिषेक बच्चन सध्या त्याच्या आगामी ‘आय वाँट टू टॉक’ या चित्रपटाचं प्रमोशन करतोय. ‘पिकू’ या चित्रपटाचे दिग्दर्शक शूजित सरकार अभिषेकच्या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याने बरंच वजन वाढवलं होतं. नुकताच या चित्रपटाचा म्युझिक लाँच कार्यक्रम पार पडला. यावेळी अभिषेक त्याच्या अनुभवाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. शूजितच्या या चित्रपटात काम करताना तुला काय शिकायला मिळालं, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता.

या प्रश्नाचं उत्तर देताना अभिषेक आधी मस्करीत म्हणाला, “पुन्हा कधीच चित्रपटासाठी वजन वाढवू नका. खरंच, या वयात पुन्हा वजन कमी करणं खूप कठीण होतं.” यानंतर तो पुढे म्हणतो, “हा चित्रपट तुम्हाला या गोष्टीचं आश्वासन देईल की आयुष्यात प्रत्येकासाठी एक छोटीशी जागा असते. यात तुम्हाला तुमच्या आयुष्यातील काही साधर्म्य आढळेल अशी माझी अपेक्षा आहे. आपण सर्वजण आयुष्याच्या एका चाकोरीत अडकलोय आणि जे आपण करत आलोय तेच सतत करतोय. काहीजण कॉर्पोरेट जॉब करतायत, काही कलाकार आहेत. तुम्ही काय आणि कसं करावं हे तुमचं आयुष्य ठरवतंय.”

गेल्या काही महिन्यांपासून अभिषेक आणि त्याची पत्नी ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा आहेत. त्यावर अद्याप दोघांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. मात्र या चर्चांदरम्यान अभिषेकने त्याच्या चित्रपटाच्या अनुषंगाने मांडलेलं हे मत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

शूजितसोबत काम केल्यानंतर चाकोरीबाहेर जाऊन काहीतरी वेगळं करण्याचा आत्मविश्वास मिळाल्याचं अभिषेकने सांगितलं. “आयुष्यात तुम्ही जे काही कराल, ते अविस्मरणीय असलं पाहिजे. बिझनेस, स्पोर्ट्स, फिल्म्स.. कोणत्याही क्षेत्रातील यश किंवा अपयश हे तुमच्या हातात नसतं. पण तुम्ही जे काम करताय ते काम मनापासून करणं आणि त्यातून चांगल्या आठवणी निर्माण करणं हे तुमच्या हातात आहे”, असं मत त्याने यावेळी मांडलं.

गेल्या सहा वर्षांत अभिषेकचे फक्त दोन चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. मनमर्जियाँ आणि घूमर हे त्याचे दोन चित्रपट थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आले. याशिवाय ‘द बिग बुल’, ‘ल्युडो’, ‘बॉब बिस्वास’ आणि ‘दसवी’ हे त्याचे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाले. अभिषेक लवकरच शाहरुख खान आणि सुहाना खान यांच्यासोबत सुजॉय घोषच्या चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय त्याचा ‘हाऊसफुल 5’ हा चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;