निर्मात्याकडून सूरज चव्हाणला महागडं गिफ्ट, त्याला वस्तूचं नाव उच्चारता देखील येईना, व्हिडीओ तुफान व्हायरल

निर्मात्याकडून सूरज चव्हाणला महागडं गिफ्ट, त्याला  वस्तूचं नाव उच्चारता देखील येईना, व्हिडीओ तुफान व्हायरल

suraj chavan: ‘बिग बॉस मराठी’ सीझन 5 चा विजेता झाल्यानंतर सूरज चव्हाणचं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. सूरजच्या चाहत्यांची संख्या देखील वाढली आहे. एवढंच नाहीतर अनेक ठिकाणी सूरज याला प्रमुख पाहुणा म्हणून देखील बोलवण्यात येतं. शिवाय सूरजला अनेक भेटवस्तू देखील मिळतात. आता देखील सूरज चव्हाण याला महागडी भेटवस्तू मिळाली आहे. ‘राजा राणी’ चित्रपटाच्या दिग्दर्शक शिवाजी दोलताडे आणि गोवर्धन दोलताडे यांनी सूरजला अ‍ॅप्पल कंपनीचा महागडा मोबाइल दिला आहे. सिनेमात सूरज याने महत्त्वाची भूमिका देखील साकारली आहे.

सूरज याला मोबाईल दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सूरजला भेटवसून देत शिवाजी दोलताडे आणि गोवर्धन दोलताडे म्हणतात, “सूरजला आमच्याकडून हे खास गिफ्ट देत आहोत. हे गिफ्ट त्याच्या आवडीचं आहे”.

 

 

भेटवस्तू दिल्यानंतर सूरज म्हणतो, ”मनापासून मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे… तुम्ही मला पाठिंबा दिला… मला फार चांगलं वाटलं…’ पुढे सूरज गिफ्ट उघडतो पण त्याला मोबाईलचं नाव उच्चारता येत नसल्यामुळे त्याची फजिती झाली… सूरजचा विनोदी अंदाजातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सूरज याच्याबद्दल सांगायचं झालं तर, . बारामतीच्या छोट्याश्या गावातून आलेल्या सूरजने आपल्या साध्याभोळ्या स्वभावाने महाराष्ट्रातील सर्वच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सूरजचा साधा स्वभाव आणि त्याच्या हटके स्टाईलला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं.

 

 

आपल्या झापूक झूपूक अंदाजाने त्याने सर्वांना वेड लावलं… आजही सूरजचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ‘बिग बॉस’ जिंकल्यानंतर सूरज याला 14 लाख रुपये मिळाले आहेत. याशिवाय त्याला इलेक्ट्रिक स्कूटर आणि आकर्षक ज्वेलरीही देखील मिळाली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;