सलमान खानची एक्स गर्लफ्रेण्ड सोमी अलीवर जीवघेणा हल्ला

सलमान खानची एक्स गर्लफ्रेण्ड सोमी अलीवर जीवघेणा हल्ला

बॉलीवूडचा दंबग सलमान खानची एक्स गर्लफ्रेण्ड सोमी अली तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. दरम्यान सोमी अलीवर जीवघेणा हल्ला झाला आहे. सोमीने याबाबत स्वत: खुलासा केला की, ती मानवी तस्करीचा शिकार होणाऱ्या महिलेला वाचविण्याचा प्रयत्नात तिच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यात तिचा हात फ्रॅक्चर झाला आहे. एवढेच नाही तर तिला अनेक ठिकाणी जखमाही झाल्या आहेत.

सोमी अली स्वतःला सामाजिक कार्यकर्ती म्हणवते. 48 वर्षीय सोमी सांगते की, ती मानवी तस्करीच्या पिडीतांना वाचवण्यासाठी पोलिसांसोबत मिळून काम करते. सोमी म्हणाली की, पीडितेला घरातून हाकलून देईपर्यंत तिला कारमधून बारमध्ये येण्याची परवानगी नव्हती, असे सोमीने सांगितले. पण या प्रकरणातील तिचा अनुभव पूर्णपणे वेगळा होता. कारण ती बाहेर काही लोकांसह तस्करांची वाट पाहत होती.

मानवी तस्करीचा बळी ठरणारीला वाचविण्याचा प्रयत्न करत असताना तस्करांनी तिचा हात मुरगळला. यामध्ये तिच्या हाताच्या हेअरलाईन फ्रॅक्चर झाला. सोमीने पुढे लिहीले की, जेव्हा मी पिडीतेला वाचविण्यासाठी कारमधून बाहेर आली त्यावेळी तो तस्कर आला, त्याने माझा डावा हात पकडला आणि तो जोरात मुरगळला. मी वेदनेने ओरडू लागले. सुदैवाने यात फक्त हेअरलाइन फ्रॅक्चर झाला, मात्र मला फार वेदना होत असून मी अंथरुणात पडले आहे.

सोमीला डॉक्टरांनी बरी होण्यासाठी 6 ते 8 आठवडे लागणार असल्याचे सांगितले आहे. तिचे मनगट सुजले आहे. डॉक्टरांनी तिला काही काळ प्लास्टर ठेवायला सांगितले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;